Categories: Cyber Threats

गुगल च्या वाढदिवस निमित्ताने

दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी Google स्वतःचा वाढदिवस साजरा करतो. २७ सप्टेंबर २०१८ ला गुगलने २० वर्ष पूर्ण केली आहेत. आपल्या २० वर्षांच्या जगभरातील कारकिर्दीचा एक व्हिडीओ गूगल ने डुडल वर टाकला आहे / होता.
लहानमुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच कोणत्याही बाबतीत मदत करणारे, कोणतीही माहिती क्षणात शोधून देणारे आपले गूगल आता २० वर्षांचे झाले आहे. इंटरनेट चालू आहे कि नाही हे बघण्यासाठी बऱ्याचदा गूगल च उघडून बघितले जाते आणि गूगल चा लोगो दिसल्यावर जणू जीवात जीव येतो.
या आपल्या गुगल विषयी आपण अधिक जाणून घेऊया.
१९९८ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांनी एक नवीन शोध इंजिन चालू केले. त्यामुळे जागतिक माहिती सर्वांसाठी उपलब्ध होईल. आणि ती सुद्धा अगदी मोफत. आश्चर्यकारकपणे गुगल च्या शोध नंतर २० वर्षांनी आता गुगल १५० पेक्षा अधिक भाषांमध्ये आणि १९० देशांमध्ये उपलब्ध आहे.
गुगल ची स्थापना कधी झाली?
१९९५ मध्ये स्टॅन्फोर्ड विद्यापीठात गुगल ची सुरूवात झाली तेंव्हा सर्गी ब्रिन आणि लैरी पेज भेट झाली, त्यातून च त्यांना गुगल चे भव्य स्वरूप होऊ शकते हे जाणवले आणि त्यांनी भागीदारी केली.
१९९६ मध्ये दोघांनी त्यावर अजून जास्त काम केले आणि जगभरातील माहिती एकत्र करून लोकांपर्यंत मोफत पोचवण्याची पूर्ण सिस्टिम बनवली. १९९७ साली त्यांनी गुगल चे ‘डोमेन’ नोंदवले आणि सुरु झाले google.com .
१९९८ साली ब्रिन आणि पेज यांना अँडी बेक्टोल्महॅम हे गुंतवणूकदार भेटले. त्यांच्या कडून एक लाख अमेरिकेकन डॉलर्सचा चेक प्राप्त झाला. तेव्हा खऱ्या अर्थाने गुगल कंपनी जन्माला आली आणि Google Inc. अधिकृतपणे सुरु झाली.
गूगलची स्थापना कोणी केली?
सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी गुगल ची स्थापना केली. ब्रिन आता गुगल ची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’ चे अध्यक्ष आहेत आणि जून 2018 पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. तसेच लॅरी पेज आता अल्फाबेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि जगातील नव्वद श्रीमंत व्यक्तींमध्ये  आहेत.
गुगल हेच नाव का?
गुगल चे नाव Google असे नव्हते, ब्रिन आणि पेज याना सुरुवातीला ‘बॅकरब’ असे नाव ठेवायचे होते. पण या जोडगोळीने बॅकरबला बदलून गुगल असे ठेवले, त्यामागे गणितीय उद्देश होता. जसे एकावर १०० शुन्य असे दिसतील एवढी माहिती गुगल च्या माध्यमातून गोळा होईल. “आपल्या पूर्ण विश्वाची माहिती एकत्र  करून त्या माहितीचा वापर सर्वाना मोफत करता यावा.” हे त्यांचे म्हणणे होते.
गूगल कुठे आहे?
गुगल आधी स्टॅनफोर्डमधील डॉर्म रुममध्ये होते, पण आता गुगलचे मुख्यालय कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यूमध्ये आहे. तसेच 50 विविध देशांमध्ये गुगल  चे 60,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
गुगल च्या इतर कोणत्या कंपन्या आहेत?
टीव्ही, जाहिरात आणि रोबोटिक्स यासह शेकडो क्षेत्रात गुगलच्या २०० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. गुगलच्या मालकीच्या काही मोठ्या कंपन्यांमध्ये गुगल मॅप, AdSense, YouTube आणि DoubleClick समाविष्ट आहेत.
आज गुगल किती लोक वापरतात?
गुगल कडून अचूक आकडेवारी कधीच प्रसिद्ध केली गेली नाही, पण प्रतिक्रियांनुसार गुगल हे अब्जावधी लोकांकडून वापरलं जात. गुगल वापरत नाही असा इंटरनेट वापरणारे अगदी तुरळक असतील असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.
गूगल चे भविष्यातील शोध –
गुगल सध्या आणि भविष्यातही आर्टीफिशीअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि वर्चुअल रिऍलिटी (आभासी वास्तव) यावर मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि विविध शोध लावत आहे. या शोधांचा उपयोग सामान्य लोकांसाठी करणं एक वरदानच ठरणार आहे.
तसेच करमणूक क्षेत्रात गुगल लेन्स चा वापर वाढणार असून त्याद्वारे गुगल फोटो (इमेजेस) वापरणे अधिक सोपे होणार आहे. सध्या गूगल कॅमेरा वापरून आपण केवळ फोटोच्या साहाय्याने त्या फोटोची माहिती बघू शकतो.
गुगल बातम्या आणखी जास्त अचूक, प्रभावी आणि स्थानिक स्तरावरील देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
गुगल चे सर्च इंजिन कसे काम करते ?
अनेक लोकांना असा गैरसमज असतो कि गुगल आपल्याला हवी ती माहिती तयार करून देते. गुगल स्वतः माहिती तयार करत नाही, फक्त ती माहिती कुठे सापडेल ते शोधून देतो. इंटरनेट वर असलेल्या असंख्य वेबसाईट वरील माहिती गुगल आपल्यासमोर आणतो.
इंटरनेट वर असंख्य वेबसाईट आहेत, त्या वेबसाईट गुगल कडून माहिती मिळवण्यासाठी स्कॅन केल्या जातात. यासाठी गुगल चे ‘बॉट’ किंवा रोबोट आहेत, त्यांना ‘क्रॉलर’ म्हणतात. यातील माहिती अगदी एखाद्या ग्रंथालयप्रमाणे वेगवगेळ्या पद्धतीने सूचित केल्या जातात. तसेच यांची इंडेक्स केली जाते. यात अनेक तांत्रिक बाबी वापरून हि सर्व माहिती साठवली जाते, आणि जेंव्हा एखाद्या व्यक्तीकडून अशा माहितीची किंवा त्या माहितीच्या अर्थाची माहिती विचारली जाते, त्यावेळी गुगल अगदी सहज ती माहिती देतो. म्हणजेच ती माहिती कुठल्या वेबसाईटवर आहे ते दाखवतो.
या गुगल च्या संपूर्ण क्लिष्ट प्रक्रियेचा वापर आता व्यावसायिक दृष्टीकोनातून होऊ लागला आहे. याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) म्हणतात. म्हणजेच एखादी वेबसाईट गुगल वर जास्तीत जास्त वर कशी दिसेल, तसेच गुगल कडून त्या वेबसाईट ची माहिती अधिक प्रभावीपणे लोकांना कशी दाखवली जाईल हा आता एखाद्या व्यवसायाच्या प्रगतीचाच एक भाग झाला आहे. यासाठी विविध कंपन्यांकडून यासाठी मोठी रक्कम मोजली जाते.
– ओंकार गंधे (सायबर आयटी तज्ञ)
Share
Onkar Gandhe

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.

Recent Posts

कोण आहे मुस्कान बावा? तिने शिक्षणासाठी इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपये मागितले आणि ट्रोल झाली. काय आहे नक्की प्रकार?

आजकाल क्राउडफंडिंग ही एक सामान्य संकल्पना बनली आहे. क्राउडफंडिंग म्हणजे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून…

10 months ago

एन एफ टी (NFT) म्हणजे काय?

मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले.  मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही…

1 year ago

मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?

मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल…

1 year ago

स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांची ‘थेरं’

गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब…

1 year ago

काय आहे वेब ३.०? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये  इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि…

1 year ago

पेटीएम’ चे फेक ॲप – फसवणूक वाढतेय

आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण  ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन…

1 year ago