फेसबुकने नुकतीच वेबसाइट बिल्डिंग सर्व्हिस आणि विनामूल्य क्लाऊड गेमिंग सुरू करणार असल्याचे जाहीर केले.
फेसबुक होस्टिंग
फेसबुक होस्टिंग सर्व्हिसेस पुढील काही महिन्यांत उपलब्ध असतील. होस्टिंग सेवा नवीन व्यवसायांना ट्रायल स्वरूपात विनामूल्य देण्यात येईल, त्यामुळे नवीन होस्टिंग पर्याय शोधत असलेल्या कंपन्यांना आकर्षित होतील. फेसबुक होस्टिंग सर्व्हिस चा एक मुख्य फायदा म्हणजे यूजरला त्यांचे व्हॉट्सअॅप संदेश कोणत्याही वेगळ्या सॉफ्टवेयर शिवाय सहज मॅनेज करता येतील. सध्या बल्क मेसेज पाठवण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात.
तसेच यामध्ये अनेक छोटे मोठे पर्याय उपलब्ध असतील ज्याचा फायदा छोट्या आणि मध्यम व्यवसायांना होणार आहे. व्यवसाय सुरू करणे, उत्पादने विक्री करणे, त्यांची यादी अद्ययावत ठेवणे, पेमेंट स्वीकारणे आणि त्याचे संदेश त्वरित पाठवणे इत्यादी गोष्टींमुळे ऑनलाईन व्यवसायाला चालना मिळेल.
विनामूल्य क्लाउड गेमिंग सेवा
फेसबुक एक गेम स्ट्रीमिंग सेवा देखील सुरू करीत आहे, ज्याचा वापर करून गेमर्स ऑनलाईन गेम खेळू शकतील तसेच सोबत स्ट्रीम (Stream) करू शकतील. सध्या थोड्या फार प्रमाणात फेसबुक गेमिंग ला प्रोत्साहन देतच आहे, पण हि पूर्ण नवीन सेवा सुरु झाल्यावर यात एक चांगली भर पडेल. फेसबुक गेमिंग द्वारे गेमर्स पैसे मिळवू शकतील, परंतु ऍड शेयरिंग किती असेल हे फेसबुक कडून कळविल्यात आलेले नाही.
फेसबुकच्या क्लाउड गेमिंग सेवेद्वारे
Asphalt 9: Legends
Mobile Legends: Adventure
PGA TOUR Golf Shootout
Solitaire: Arthur’s Tale
WWE SuperCard
Dirt Bike Unchained हे गेम्स उपलब्ध आहेत आणि लवकरच आणखी गेम जोडले जातील. हे गेम फेसबुकच्या गेमिंग विभागात उपलब्ध आहेत.
फेसबुक जाहिराती “क्लाऊड प्ले” माध्यमातून चालवणार असल्याचे फेसबुक ने प्रसिद्ध केले आहे. तसेच गेम्सचे मिनी डेमो हो उपलब्ध असणार आहेत. फेसबुकद्वारे क्लाउड गेमिंग अँड्रॉइड व वेबवर उपलब्ध असेल. IOS वर हे उपलब्ध नसेल. फेसबुकचे सध्याचे लक्ष हे ३०० लाख पेक्षा जास्त गेमर्स कडे आहे, जे युट्युब गेमिंग वापरत आहेत. प्रसिद्ध युट्युब गेमर्स साठी काही खास सुविधा फेसबुक देऊ शकते.
आजकाल क्राउडफंडिंग ही एक सामान्य संकल्पना बनली आहे. क्राउडफंडिंग म्हणजे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून…
मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले. मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही…
मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल…
गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब…
गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि…
आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन…