Cyber Threats

सदस्यांच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ऍडमीनला जबाबदार धरता येणार नाही, हायकोर्टाचा निर्णय

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील दुसर्‍या एखाद्या सदस्याने आक्षेपार्ह पोस्ट केल्यास व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ऍडमीनला कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरता येणार नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणाबाबत दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील एखाद्या सदस्याने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास अशा व्यक्तीस जबाबदार धरता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. आक्षेपार्ह पोस्ट म्हणजेच मेसेज, फोटो, ऑडिओ किंवा व्हिडीओ जे कायद्याचे उल्लंघन करत असेल तर ती पोस्ट करणाऱ्या किंवा फॉरवर्ड करणाऱ्या सदस्याला जबाबदार धरले जाईल. त्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई होईल.

न्या. झेड. ए. हक आणि न्या. ए. बी. बोरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या गोष्टी नमूद केल्या. “ग्रुप ऍडमीन हा केवळ सदस्याला ग्रुप मध्ये सामील करून घेऊ शकतो किंवा काढून टाकू शकतो. सदस्यांनी ग्रुपमध्ये काय टाकले आहे, त्यावर निर्बंध आणू शकत नाही. तसेच ते डिलीट करू शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला सेन्सॉर करणे शक्य नाही.”

ग्रुपमधील एखाद्या ऍडमिन ने स्वतः काही आक्षेपार्ह पोस्ट केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच करण्यात येईल. IPC चे विविध कलम तसेच आयटी ऍक्ट ६७ नुसार योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे.

 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ऍडमीन जरी कायदेशीर जबाबदार नसला तरी नैतिकदृष्ट्या ऍडमीन ने खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते –

१) व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप नक्की कशासाठी आहे हे नमूद करणे गरजेचे आहे.
२) कोणताही ग्रुप असेल तरी कोणत्या प्रकारच्या पोस्ट टाकाव्यात आणि कोणत्या टाकू नयेत याची पूर्वसूचना ऍडमीन ने सदस्यांना द्यावी.
३) व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शक्यतो नेहमीच्या परिचयातील लोकच सामील करून घ्यावे.
४) खूप अनोळखी लोक असतील किंवा सर्वांनी बोलणे गरजेचे नसेल, तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची सेटिंग बदलून केवळ ऍडमीनच मेसेज करू शकेल अशी करावी.
५) एखाद्या सदस्याने आक्षेपार्ह पोस्ट केल्यास ऍडमिन ने त्वरित संबंधित सदस्याला ती पोस्ट काढून टाकण्यास सांगावे, त्या बाबत माफीनामा घ्यावा. तसेच गरज पडल्यास त्या सदस्याला ग्रुप मधून काढून टाकावे.
६) सदस्य ऐकत नसल्यास कायदेशीर कारवाईसाठी पोलिसात तक्रार करावी.
७) जर एखादा ऍडमीन आक्षेपार्ह पोस्ट करत असेल, तर सदस्यांनी त्याबाबत तक्रार करावी. तसेच असा ग्रुप त्वरित सोडावा.

आपली सायबर सुरक्षा आपल्याच हातात असते.

– ओंकार गंधे (सायबर सुरक्षा तज्ज्ञ विश्लेषक)

 

 

 

(Images for reference purpose only and may be subject to their Copyrights)

 

 

सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible (US Only)Click Here to Listen

Share
Onkar Gandhe

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.

Recent Posts

कोण आहे मुस्कान बावा? तिने शिक्षणासाठी इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपये मागितले आणि ट्रोल झाली. काय आहे नक्की प्रकार?

आजकाल क्राउडफंडिंग ही एक सामान्य संकल्पना बनली आहे. क्राउडफंडिंग म्हणजे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून…

1 year ago

एन एफ टी (NFT) म्हणजे काय?

मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले.  मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही…

2 years ago

मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?

मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल…

2 years ago

स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांची ‘थेरं’

गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब…

2 years ago

काय आहे वेब ३.०? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये  इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि…

2 years ago

पेटीएम’ चे फेक ॲप – फसवणूक वाढतेय

आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण  ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन…

2 years ago