मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?

metaverse in marathi cyber sakshar

मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटाव्हर्स. संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग. पण ते इतके हुबेहूब ज्यामुळे असा प्रश्न पडेल कि खरे जग चांगले कि आभासी जग?

नक्की काय आहे मेटाव्हर्स?

मेटाव्हर्स हा AI आणि VR यांच्या मदतीने गाठलेले वेब ३. ० चा फार मोठा टप्पा आहे. मित्रांसोबत स्मार्टफोन वर व्हिडीओ कॉल करण्याऐवजी जर ते मित्र खरोखर मोबाईल मधून बाहेर आले तर? ऑफिस ची मिटिंग घरबसल्या करता करता, तुमचा एक भाग ऑफिस मध्ये ही असला तर? बेडरूम मध्ये बसून स्टेडियम मध्ये बसल्याचा अनुभव घेता आला तर ?
हे सर्व शक्य आहे मेटाव्हर्स मध्ये. मेटाव्हर्स मध्ये अनेक आभासी विश्व तयार केले जात आहेत. तुम्ही स्वतः त्यात जाऊ शकता, एका अवतार च्या स्वरूपात. ते तुमचेच एक ३डी मॉडेल असेल. अगदी हुबेहूब. ते तुमचे मॉडेल या डिजिटल जगात कुठेही जाऊ शकते, तेही एका क्लीक वर.
बटन दाबले कि तुम्ही गोव्याला. एका बटन क्लीक वर तुम्ही हिमालयात, एका क्लीक वर अमेरिकेत तर एका क्लीक वर अगदी चंद्रावर सुद्धा.

मेटाव्हर्स मध्ये काय काय करता येईल ?
१. मेटाव्हर्स मध्ये ते सर्व करता येईल जे तुम्ही खऱ्या आयुष्यात करता. शिक्षण, ऑफिस चे काम, मिटिंग, खेळ, फिरणे, भेटणे, बोलणे, अगदी सर्वच.
२. मेटाव्हर्स मध्ये ते सर्वही करू शकता, जे तुम्ही खऱ्या आयुष्यात करू शकत नाही. एक क्लीक वर अमेरिकेत जाऊ शकता. एका क्लिक वर तुमच्या अवतार चे कपडे बदलू शकता. हव्या त्या ठिकाणी मिटिंग करू शकता.
३. खऱ्या आयुष्यात तुम्ही अनेक खेळ खेळू शकत नाही, पण मेटाव्हर्समध्ये कोणतेही खेळ आणि कितीही वेळ खेळू शकता. आणि साहजिकच तुमचे शरीर दमणार नाही.
४. घरात बसून तुम्ही प्रात्यक्षिक करू शकता. शाळा कॉलेज मध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही.
५. या सर्व ठिकाणी तुमचा अवतार म्हणजेच ३डी मॉडेल जाणार. तुम्ही घरात बसून जे बोललं, जे कराल, तेच तुमचा अवतार त्या ठिकाणी करेल.
६. तुमचे मित्र, नातेवाईक आणि इतर लोक ही याच पद्धतीने त्यांचे ३डी अवतार च पाठवतील.

अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक प्रकारची गेम आहे. ज्यात तुम्ही शून्यातून तुमचे डिजिटल आयुष्य सुरु करू शकता. आणि पुढे जाऊ शकता. पैसे मिळवता येतील, मजा करता येईल, शिकता येईल, सर्व काही करता येईल, आणि काही शारीरिक इजा होण्याची, आजारी पडण्याची किंवा मरणाची भीती नसेल.

 

 

मेटाव्हर्समध्ये जाण्यासाठी काय काय आवश्यक आहे ?
१. मेटाव्हर्स मध्ये जाण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे फक्त चांगला स्पीड असलेले इंटरनेट. बस.
२. स्मार्टफोन, कॉम्प्युटर, VR ग्लासेस, AR हेडसेट, इत्यादी गोष्टी गरजेनुसार लागतीलच.

मेटाव्हर्सचे फायदे –
१. मेटाव्हर्स मुळे अनेक नवीन व्यवसाय यात येऊ लागले आहेत. त्यामुळे मेटाव्हर्स मध्ये अनेक नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.
२. अगदी इंजिनियर, फॅशन डिझाइनर पासून तर चप्पल विकणाऱ्या पर्यंत.
ते कसे? बघूया. आता तो तुमचा अवतार म्हणजे ३ डी मॉडेल असेल, त्याला जर तुम्हाला नवीन कपडे घालायचे / दाखवायचे असतील, तर तुम्हाला ते मेटाव्हर्स मधेच विकत घ्यावे लागतील. मेटाव्हर्स मधेय जे फॅशन डिझाइनर ते कपडे बनवतील त्यांच्याकडून तुम्ही ते विकत घेऊ शकता.
त्यामुळे त्यांनाही उत्पन्न मिळेल. तसेच तुम्हाला तिथे जर घर घ्यायचं आहे, एखादी जागा घ्यायची आहे, एखादी गाडी घ्यायची आहे,
तर त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल, मेटाव्हर्समधेच.
३. मेटाव्हर्स मध्ये सर्वांचेच फक्त अवतार जात आहेत, त्यामुळे कोणीही कोणाला शारीरिक इजा पोचवू शकत नाही. गुन्हेगारी तशी कमी असेल, असा अंदाज वर्तवला जातो आहे.
४. सर्वच व्यवहार हे आभासी चलनाद्वारे होतील. त्यामुळे चोरी , दरोडा वगैरे गोष्टी मेटाव्हर्स मध्ये नसतील.

मेटाव्हर्सचे तोटे –
१. मेटाव्हर्सचे तोटे असे सध्या कमी आहेत. हॅकिंग आणि मेटाव्हर्स चे कमी ज्ञान यामुळे थोडी अडचण येऊ शकते.
२. सर्वच गोष्टी आणि माणसे हे निनावी असल्यामुळे ट्रॅक ठेवणे अवघड आहे.
३. पोलीस, सुरक्षा यंत्रणा किंवा आपत्कालीन यंत्रणा अशी कोणतीही सुविधा सध्या तरी मेटाव्हर्समध्ये नाही.

मेटाव्हर्स आणि त्यासंबंधित अनेक व्यवसायांमध्ये अनेक कंपन्या सध्या गुंतवणूक करत आहेत. या आभासी जगात अनेक नवीन गोष्टी येत आहेत, आणि येत राहणार. कदाचित आपले भविष्य मेटाव्हर्समध्येच आहे.

पुढील भागात आपण बघणार आहोत, या मेटाव्हर्स मध्ये तुम्हाला कसे जात येईल. तिथे पैसे कसे मिळवता येतील आणि हे सर्व सध्या तरी फुकटात कसे करता येईल.

 

 

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible  – Click Here to Listen

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top
error: Content is protected !!