News

कोण आहे मुस्कान बावा? तिने शिक्षणासाठी इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपये मागितले आणि ट्रोल झाली. काय आहे नक्की प्रकार?

आजकाल क्राउडफंडिंग ही एक सामान्य संकल्पना बनली आहे. क्राउडफंडिंग म्हणजे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून आर्थिक मदत घेणे. सध्या क्राउडफंडिंगमध्ये मदत करणाऱ्या अनेक वेबसाइट्स आहेत. पैसे उभारण्याची ही पद्धत आजारी लोकांसाठी फार पूर्वीपासून वापरली जात आहे. गरीब किंवा गरजू लोक, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे, ते अशा प्रकारे पैसे गोळा करतात आणि उपचार घेतात.

 

पण, क्राउडफंडिंग करणारी एक तरुणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिची एक गरज पूर्ण करण्यासाठी तिने लोकांकडे आर्थिक मदत मागितली. पण, तिने लोकांची मदत कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी नाही, तर परदेशात जाऊन मोठ्या संस्थेत शिकण्यासाठी घेतली आहे! चंदिगढमध्ये राहणारी मुस्कान बावा गेल्या काही दिवसांपासून क्राऊडफंडिंग मोहीम राबवत आहे. पण, यामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. मुस्कानने केटो नावाच्या क्राउडफंडिंग वेबसाइटद्वारे लोकांकडून मदत मागितली आहे.

मुस्कानच्या पोस्टनुसार तिला हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. मानव विकास आणि शिक्षण या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिला तिथे जायचे आहे. तिने जवळच्या मित्रांकडून आणि हार्वर्ड क्रेडिट युनियनकडून कर्ज घेतल्याचे तिने सांगितले. तिने 4 वर्षे अनेक संस्थांमध्ये कामही केले, परंतु हार्वर्डला जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेथे गेल्यानंतर तिने आपले शिक्षण पुढे नेण्यासाठी शिष्यवृत्ती, कर्ज आणि अर्धवेळ काम करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु पैशाची कमतरता असल्याने ती लोकांकडून मदत घेत आहे. मुस्कानला या साइटद्वारे 23 लाख रुपये जमवायचे आहेत, ज्यामध्ये १४ लाख रुपये अनेक लोकांनी योगदान दिले आहेत.

अनेक सोशल मीडिया पेजने तिच्या क्राउडफंडिंगचा प्रचार सुरू केला. पण, तेव्हापासून ती ट्रोलिंगची शिकार झाली. लोक म्हणतात की भारतात अनेक मोठ्या संस्था आहेत, जर तिच्याकडे पैसे नसतील तर तिने इतरांचे पैसे खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या पैशाने भारतातील मोठ्या संस्थेत शिकावे. ही देणगीची थट्टा असल्याचे अनेकांचे मत आहे.

 

सायबर साक्षरच्या टीमने याबाबत तपास केला. त्यावरून पुढील काही गोष्टी समोर आल्या –

१) मुस्कान हिने केटो आणि मिलाप या साईट्सवर आर्थिक माहितीसाठी क्राउडफंडिंग सुरु केले होते. या २ साईट व्यतिरिक्त सुद्धा काही साईट्सवर क्राउडफंडिंग केले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कदाचित हे खूप आधीपासून सुरु असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
२) केटो आणि मिलाप या दोन्ही साईट्सवर मागितलेल्या मदतीचा आकडा वेगळा असल्याने मुस्कान बद्दल लोकांचा संशय वाढला.
३) या दोन्ही साईट्स वर तिचे शहर वेगवेगळे दाखवले गेले होते. एका साईट वर चंदिगढ तर दुसऱ्या साईट वर धर्मशाळा.
४) मुस्कान बावा कोणत्याही सोशल मीडियावर दिसून आली नाही. तिच्या नावाशी साधर्म्य असलेले काही अकाउंट आहेत, पण ते तिचे नाहीत.
५) मुस्कान बावा बद्दल कोणाकडेच ठोस अशी माहिती नाही.
६) तिने काही वर्षांपूर्वी ‘यश मॉडेल, मुंबई’ येथे मॉडेलिंग साठी नोंदणी केल्याचे समजून आले. पण यश मॉडेल कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी आपल्याकडे तिचा जुना नंबर असल्याचे सांगितले.
७) “भारतातून पहिल्यांदाच सर्वांत कमी वयाची मुलगी, जी हार्वर्ड विद्यापीठात जात आहे” असा दावा केला गेला होता. पण जर हे खरं असेल, तर मीडियामध्ये याची अजिबात चर्चा केली गेली नाही. ना तिचा कोणी सत्कार केला, ना कोणी मुलाखत घेतली.

 

या काही गोष्टींमुळे हे पूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते.

 

सोशल मीडियावर वाढत असलेला विरोध बघून, “हुमन्स ऑफ बॉंबे” या संस्थेने पत्रक काढून लोकांना पैसे परत देण्याची तयारी दर्शवली. हुमन्स ऑफ बॉंबे ही तीच संस्था होती, जिने सर्वांत प्रथम मुस्कान बावाला मदत करण्याबाबत लोकांना आवाहन केले होते.

 

एका रिपोर्ट नुसार, मुस्कान हार्वर्ड विद्यापीठात गेली सुद्धा.! तर काहींच्या मते हा पूर्ण “आर्थिक फसवणुकीचा प्रकार आहे.

 

खरे खोटे काहीही असेल, तरी आपण कोणालाही आर्थिक मदत करताना काळजी घ्यायला हवी, हे नक्की.!

 

 

 

Tags : Muskaan Bawa, Muskan Bawa Ketto, Muskan Bawa in Marathi, Muskan bawa milaap

Share
Team CyberSakshar

Recent Posts

एन एफ टी (NFT) म्हणजे काय?

मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले.  मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही…

1 year ago

मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?

मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल…

1 year ago

स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांची ‘थेरं’

गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब…

1 year ago

काय आहे वेब ३.०? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये  इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि…

1 year ago

पेटीएम’ चे फेक ॲप – फसवणूक वाढतेय

आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण  ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन…

1 year ago

एसएमएस हेडर कसे चेक करणार?

आजकाल आपल्याला मोबाईल वर अनेक मेसेज येत असतात. त्यातील अनेक एसएमएस हे काही ना काही…

2 years ago