सावधान, तुम्हाला कुणीतरी पाहतंय, सावधान तुम्हाला कुणीतरी ऐकतय…..

someone-is-watching-you

अश्मायुतील माणूस दगडाचा वापर करून स्वतःची “अन्न” ही गरज भागवायचा,हळु हळु तो शेती करायला शिकला, चाका सोबत नवनवीन अवजारांचा शोध लावत गेला, अन् सोबतच तंत्रज्ञान विकसित होत गेले, अन् आजच्या युगात अन्न वस्त्र निवारा , सेक्स आणि इंटरनेट या माणसाच्या अत्यावश्यक गरजा झाल्या आहेत अस म्हंटले तर काहीच वावग ठरणार नाही; कारण अन्न, वस्त्र अन् निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की मनुष्य धावतो नवनवीन तत्रज्ञानाने विकसित झालेल्या गोष्टीमागे, आणि आपल सध्या तेच झालं आहे.कुतूहल म्हणून वापरायला सुरुवात केलेली गोष्ट आज गरज बनली आहे हे तितकंच खर..

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोन आणि त्याला असलेली इंटरनेट ची जोड ही माणसाच्या रोजच्या जीवनातली एकदम कॉमन अशी गोष्ट, एखादी गोष्ट माहीत नसली तर आपण सहज बोलुन जातो जरा गुगल करून बघ.. पूर्वी असायची वर्तमान पत्र, टिवी, रेडीओ इत्यादी आता मात्र या सर्वांची जागा हळु हळु स्मार्ट फोन अन् त्यातल्या खिडकीतून डोकावणारे वेग वेगळे ऍप्लिकेशन घेत आहेत… सोशल मीडिया नावाचा प्रकार आज खुप वाढला, त्यामुळे माहिती सामान्यांपर्यंत पोहोचणं फार च सोपं झालंय..

आज व्हॉटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब कोणाला नाही माहित?

हे ऍप्लिकेशनस म्हणजे तर अगदीच काहींचे करमणुकीचे साधन, संवाद साधणे यामुळे फारच सोपं झालंय, आजकाल घर साधं असेल तरी चालेल पण स्मार्ट फोन हा हवाच, काळाची गरज च नाही का? आता थोड विचार करू, पूर्वी कसं व्हायचं, टीव्ही विकत घायचा मग त्यावर करमणुकिसोबत जाहिराती ही पहायच्या, सारख्या सारख्या जाहिराती पाहून आपण ही प्रभावित होतोच उदाहरणार्थ, “वॉशिंग पावडर निरमा, दुधसी सफेदी निरमा से आयी, रंगिन कपडा भी खील खिल जाये, सबकी पसंद निरमा, निरमा”.. आता खर खर सांगा, हे वाचताना तुमच्या डोक्यात चालि सकट ही जाहिरात वाजली की नाही? मला शंभर टक्के खात्री आहे याचं उत्तर “हो” असच आहे.., अश्या तर्हेने ही निरमा आपल्या डोक्यात शिरली. अन् मग आपल्या घरात , अन् अश्याच बऱ्याच काही गोष्टी जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या घरात, तसेच आयुष्यात एंटर झाल्या ; ही झाली टीव्ही ची पॉवर…

आता थोड पुढे येऊ, आपल्या हातात आहे हा स्मार्ट फोन ज्यावरून आपण बरेच ऍप्लिकेशन डाऊनलोड करतो आणि वापरतो, तस पाहिलं तर ही सर्व ऍप्लिकेशन फ्री असतात, पण हे वापरण्यासाठी काही टर्म अँड कंडीशन असतात, त्याला परवानगी दिल्या शिवाय आपल्याला हे ॲप वापरताच येत नाहीत, आणि आपण या  टर्म अँड कंडीशन न वाचताच येस येस अस करत अक्सेप्ट करतो. थोडक्यात आपण आपल्या आपण पैसे देऊन विकत घेतलेल्या स्मार्ट फोन मध्ये असलेला सर्व डाटा म्हणजे माहिती वापरण्याची सर्व च्या सर्व परवानगी या एप्लिकेशन्सला स्वतः च देतो, जसं की व्हॉटसअपला किंवा इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला कॅमेरा, मायर्क्रोफोन, स्टोरेज वापरण्याची परवानगी आपणच कळत नकळत दिलेली असते.. आपण कधी साधा विचार केलाय का, या जगात खरच काही फुकट असते का, अन् जर नसते तर हे ॲप आपल्याला फुकट कसकाय बरे वापरायला मिळत असतील? याच उत्तर अस आहे की जेंव्हा आपणच या अॅप्स ला वरील सर्व गोष्टींची परवानगी दिलेली असते तर ही अॅप्स आपला डाटा गोळा करत असतात, आपण काय बोलतो हे ही ॲप्स मायक्रोफोन द्वारे ऐकत असतात, अन् मग आपल्याला तशाच जाहिराती दाखवल्या जातात, आणि या जाहिरातींच्या माध्यमातून ही ॲप्स पैसे कमवतात. या ॲप्स वाल्यांकडे म्हणे असा खुप लोकांचा डाटा असतो, त्याला म्हणतात “बिग डाटा” मग यात आपण काढलेले फोटो असतील, व्हिडिओ असतील, ऑडियो असतील , डॉक्युमेंट्स असतील, मेसेजेस असतील, एवढंच काय बँकेचे डिटेल्स असतील, ओटीपी असतील, सोशल मीडिया अकाउंट्स चे पासवर्ड असतील, असेल नसेल ती सर्व माहिती या “बिग डाटा” मध्ये असते. मला तर असेही कळले आहे की, हा बिग डाटा म्हणे विकला जातो, एका माणसाच्या वर्ष भराच्या डाटा ची किंमत म्हणे सहा रुपये असते. आता विचार करा हा डाटा जर एखाद्याच्या हातात पडला तर तो एखाद्याचे आयुष्य ही उध्वस्त करू शकतो, एखाद्याच्या काही खाजगी गोष्टी या बिग डाटा मध्ये असल्या अन् त्या कुणाच्या ताब्यात आल्या तर त्या खासगी गोष्टी सार्वजनिक झाल्या तर काय होईल, खासगी गोष्ट सार्वजनिक होणे म्हणजे नागडं होणेच की, मग उरतो एकच पर्याय एकतर आत्महत्या किंवा काही घडलच नाही असा गैरसमज करून जगणे. एखाद्याच्या बँक खात्यातील पैसे चोरणे ही तितकेच सोपे, कैक लोकांच्या बँक खात्यातील रक्कम गायब झाल्याच उदाहरण आहेत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, ही झाली नाण्याची निगेटिव्ह बाजु.

आता या गोष्टी जर चुकवायच्या असतील तर आपणही तितकीच काळजी घेणं गरजेचं नाही का?  मग आता काळजी घ्यायची म्हणजे नेमक काय करायचं? थोड जागरूक व्हायचं एवढंच, जस आपल्या स्मार्ट फोन क्या सेटिंग मध्ये जाऊन आपण कोणत्या कोणत्या अॅप्स ला कोण कोणत्या गोष्टीच्या अक्सेस ची परवानगी दिली आहे हे तपासणे, मग ज्या अॅप्स ला कॅमेरा वा मायक्रोफोन व इतर गोष्टींच्या अक्सेस ची गरज नाही त्या अॅप्स ला दिलेली परवानगी काढून टाकणे. नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्स चा पासवर्ड बदलत राहणे, आपल्या जी मेल चा पासवर्ड वेळोवेळी बदलणे, काम झाले की इंटरनेट बंद करणे, अश्या छोट्या छोट्या गोष्टी आपणास सायबर क्राईम चा व्हिक्टीम होण्यापासून वाचवू शकतात.

आता बोलू थोड सोशल मीडिया विषयी, आजकाल लोकं एकमेकांपासून दुरावली अन् सोशल मीडियाच्या खिडकी तुन मात्र दुसऱ्या च्या आयुष्यात डोकावण्या चा प्रकार मात्र फार वाढला, तस पाहिलं तर आयुष्यात जाम काळोख पण लोकांची सोशल मीडिया अकाउंट्स पाहिली तर एखाद्याला हेवा वाटेल एवढी हिरवळ दिसत असते अन् त्यात काही अती हुशार लोक स्वतःची पुर्ण च्या पुर्ण माहिती फेसबुक वर टाकत असतात, मग लग्नाच्या फोटोंपासून, बाळ जन्माला आले किंवा कुणी दगावले याची एकूण एक माहीती अगदी सहज उपलब्ध होते, म्हणजे गुन्हेगारांना आपल्या अपडेट्स आपणच देत असतो, अन् मग मौका पाहून चोरटे भुरटे बरोबर चौका मारतात. अन् या अश्या फालतू सवयीना आपणच कुठे तरी आवर घालायला नको का? असो शेवटी हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न पण कुठली गोष्ट किती ताणायची हेही आपणच ठरवलेलं बर नाही का? कारण याबाबतीत आपण आता सावध झालो नाही तर त्याचे होणारे दुष्परिणाम ही आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. असे म्हणतात की, “वेळीच घातलेला एक टाका पुढचे दहा टाके वाचवतो” म्हणुन मी एवढंच म्हणेल,

सावधान, तुम्हाला कुणीतरी पाहतंय, सावधान तुम्हाला कुणीतरी ऐकतय….

 

 

 

तेजस्विता खिडके (पुणे)

व्यवसाय रणनीतीकार, सल्लागार आणि वक्त्या

 

(सदर लेख सायबर साक्षर दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)

Back To Top
error: Content is protected !!