सदस्यांच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप ऍडमीनला जबाबदार धरता येणार नाही, हायकोर्टाचा निर्णय
व्हॉट्सअॅप ग्रुपमधील दुसर्या एखाद्या सदस्याने आक्षेपार्ह पोस्ट केल्यास व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ऍडमीनला कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरता येणार नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणाबाबत दिली. व्हॉट्सअॅप ग्रुपमधील एखाद्या सदस्याने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास अशा व्यक्तीस जबाबदार धरता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. आक्षेपार्ह पोस्ट म्हणजेच मेसेज, फोटो, ऑडिओ किंवा व्हिडीओ जे कायद्याचे उल्लंघन […]