Seminar – Computer Engineering KBTCOE, Nashik

नाशिक (११ डिसेंबर) : आपली ऑनलाईन सुरक्षितता आपल्याच हातात आहे. सायबर सुरक्षेवर आज केबीटी इंजिनीरिंग कॉलेज (KBTCOE) गंगापूर रोड, नाशिक येथील कॉम्प्युटर इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि सायबर साक्षरचे संचालक ओंकार गंधे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वांनी विशेषतः मुलींनी सोशल साईट्स वापरताना कशी काळजी घ्यावी, मॅट्रिमोनिअल साईट्स मध्ये कसे धोके असतात, याबाबत त्यांनी सांगितले.

यावेळी फेसबुक कसे हॅक होऊ शकते, फेक आकाऊंट कसे ओळखायचे, सुरक्षित ऑनलाईन व्यवहार, बनावट वेबसाईट्स, अफवा पासरवण्याऱ्या लिंक्स इत्यादी बाबत ओंकार गंधे यांनी प्रात्यक्षिक दाखवले.

विविध ऑनलाईन धोके, सायबर गुन्हे आणि त्यावर होणारी कडक कायदेशीर कारवाई याबाबत ही गंधे यांनी सांगितले. नुकत्याच समोर आलेल्या ई-मेल द्वारे खंडणी मागण्याच्या घटनांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले, तसेच यातून काय काळजी घ्यावी आणि असे घडल्यास काय करावे याबाबत सांगितले. पबजी सारख्या गेम च्या माध्यमातून नुकतेच काही नवीन गुन्हे समोर आले आहेत. बुलढाणा येथील एक १३ वर्षांची मुलगी ऑनलाइन गेम मुळे थेट घर सोडून निघून गेली. याबाबत ओंकार गंधे यांनी विद्यार्थ्यांना सावध केले. सायबर साक्षर तर्फे ओंकार गंधे नेहमीच असे सायबर जनजागृती साठी कॉलेज, शाळा, खाजगी संस्था इत्यादी ठिकाणी विविध कार्यक्रम घेत असतात. सायबर तज्ज्ञांचे वेळीच मार्गदर्शन घ्यावे हे फायद्याचे ठरते.

सायबर जनजागृतीची विद्यार्थ्यांना खूप गरज आहे असे मत विभागप्रमुख डॉ. वैशाली तिडके यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी डॉ. वैशाली तिडके, प्रा. सोपान तळेकर, प्रा. पुष्कर शिंदे उपस्थित होते. सायबर साक्षर तर्फे मृण्मयी नाईक, विनिता गंगावणे आणि प्रारब्ध ढवळे यांनी काम पहिले.

Back To Top
error: Content is protected !!