स्नेहा भोसले नावाने खोटे प्रोफाईल आणि होणारी फसवणूक

काही दिवसांपासून “स्नेहा भोसले” या नावाच्या फेसबुक अकाऊंटद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः या अकाऊंटवरून तरुण मुले आणि पुरुषांना लक्ष्य केले जात आहे. बदनामीच्या भीतीने फारसे कोणी तक्रार करण्यास पुढे येत नाही.

कार्यप्रणाली –

“स्नेहा भोसले” या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून अनेक तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. “फ्रेंड रिक्वेस्ट” स्विकारल्यावर स्नेहा भोसले नामक व्यक्ती कडून आर्थिक मदतीसाठी मेसेज येतो. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी, औषध खर्चासाठी, हॉस्पिटल बिलासाठी, इत्यादी कारणे सांगून पैसे देण्याची विनंती केली जाते. मुलीचा फोटो आणि केलेली भावनिक विनंती याने भावुक होऊन अनेक जणांनी आतापर्यंत बरीच रक्कम पाठवली असल्याचे समोर आले आहे.

५००, १००० पासून तर अगदी ५०,००० रुपयांपर्यंत लोकांनी मदत केल्याचं सध्या समोर येत आहे. युपीआय (UPI) च्या माध्यमातून हे पैसे घेतले जात आहेत. हे फेक प्रोफाइल असल्याची जाणीव होई पर्यंत पैसे गेलेले असतात. हे प्रकार अजूनही फेसबुकवर सुरु आहेत, तसेच आता या भामट्यांकडून इंस्टाग्रामचाही वापर सुरु झाला आहे. “स्नेहा भोसले” नावाने आता अनेक प्रोफाइल सुरु केल्या जात आहेत.

अत्यंत महत्वाचे –

१) “स्नेहा भोसले” नावाच्या खोट्या प्रोफाइल वरून आलेली ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये.

२) सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नये.

३) कोणाच्या भावनिक विनंतीवर “खात्री” केल्याशिवाय विश्वास ठेऊ नये.

अनेक जणांची फसवणूक होऊनही केवळ २,३ यूजर्सच या प्रकरणात पुढे आले आहेत. ज्यांची ज्यांची अशी फसवणूक झाली असेल, त्यांनी तात्काळ पुढे येऊन याबाबत तक्रार करावी. वेळीच तक्रार केल्यास पुढील तांत्रिक कारवाई करण्यास मदत होऊ शकेल.

 

या प्रकरणात काही जणांनी फसवणूक झालेली नसताना फसवणूक झाल्याचा बनाव केला तर काही जणांनी खोटे स्क्रिनशॉट प्रसिद्ध करून मूळ भामट्यांना वाचवण्याचाही प्रयत्न केला.

 

या प्रकरणात भामट्यांकडून खालील बँक अकाऊंट वापरले गेले.

नाव – Santara Khatun

Account Number – 33667970748

IFSC – SBIN0008437

हे खाते भारतीय स्टेट बँकेची कालियचक (पश्चिम बंगाल) येथील आहे.

 

 

हे काही पहिलेच प्रकरण नाही. या आधी “स्वाती बापट” नावानेही असाच प्रकार घडून गेला आहे. तरीही लोक सायबर साक्षर साक्षर होत नाहीत.

 

Press Note – View / Download

 

(Images for reference purpose only and may be subject to their Copyrights)

 

सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

 

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible (US Only)Click Here to Listen

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top