अश्लील व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचे वाढते प्रकार – अनेक तरुणांची झोप उडवली

गेल्या काही महिन्यांपासून अश्लील व्हिडीओ कॉल द्वारे तरुणांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या काळात हे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. यात विशेषतः तरुण मुले आणि पुरुषांना लक्ष केले जाते. तसेच याबाबत तक्रार करण्यास फारसे कोणी पुढे येत नाही.

कार्यप्रणाली –

  • यामध्ये सर्वांत आधी फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीच्या नावाने तरुणांना संपर्क केला जातो. फेसबुकवर आलेली मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारल्या नंतर संभाषण सुरु होते. थोड्या संभाषणानंतर व्हॉट्सॲप नंबर मागितला जातो आणि पुढील संभाषण तिकडे करण्यास सांगितले जाते.
  • व्हॉट्सॲपवर हे संभाषण अश्लील शब्दात सुरु होते आणि काही वेळाने व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले जाते.
  • व्हिडीओ कॉल मध्ये महिला किंवा मुलगी बोलताना दिसते, तसेच समोरच्या तरुणाला अश्लील चाळे करण्यास सांगितले जाते. काही वेळा बिना कपड्यांचा व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडला जातो.
  • त्यानंतर कॉल बंद होतो आणि परत संपर्क केला जात नाही.
  • काही वेळातच वेगळ्या नंबर वरून या व्हिडीओ कॉल ची पूर्ण रेकॉर्डिंग पाठवली जाते. तसेच त्या तरुणाच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवण्याची धमकी दिली जाते. याबदल्यात पाच ते पंधरा हजार रुपये त्वरित पाठवण्याची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.

अत्यंत महत्वाचे – असा कोणताही ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडल्यास त्वरित जवळच्या सायबर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल करावी किंवा सायबर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

कोणत्याही अनोळखी व्यक्ती / महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. सोशल मीडियावर कामाव्यतिरिक्त संभाषण करताना काळजी घ्यावी, तसेच व्हॉट्सॲप नंबर देऊ नये.

Press Note – View / Download

(Images for reference purpose only and may be subject to their Copyrights)

 

 

सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible (US Only)Click Here to Listen

President, Cyber Sakshar [Cyber Security Analyst and Consultant]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!