मॅट्रिमोनिअल साईट्स

सध्याच्या डिजिटल झालेल्या युगात लग्न जुळवण्याची पारंपरिक पद्धतही ऑनलाईन झाली आहे, पण हे कितपत योग्य आहे आणि यात धोके काय आहेत ?
लग्न जुळवण्याचा पारंपरिक पद्धतींसोबतच आता ऑनलाईन हि आपला जोडीदार शोधला जातो, निवडला जातो आणि लग्नही ऑनलाईन ठरते.
यासाठी गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन वेबसाईट्स सुरु आहेत, त्यांना मॅट्रिमोनिअल साईट्स असेही म्हणतात.
पूर्वी लग्न जुळणाऱ्या किंवा इच्छुक वर/वधू शोधून देणाऱ्या संस्था होत्या, आजही आहेत. त्याच संस्थांचे ऑनलाईन स्वरूप म्हणजे या मॅट्रिमोनिअल वेबसाईट्स.
शेकडो हजारो प्रोफाईल्स मधून आपल्या आवडी निवडी नुसार आपण आपला जोडीदार निवडू शकतो. ऑनलाईन च फोटो बघून, माहिती वाचून पसंती केली जाते. काही वेळा चॅट किंवा ई-मेल च्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क केला जातो. त्यापुढे मग फोन वर बोलणं होत. अशा मॅट्रिमोनिअल साईट्स वरून यशस्वी लग्न जुळवलेले अनेक जोडपी आहेत.
मॅट्रिमोनिअल साईट नक्की कशी चालते?
लग्न जुळवण्यासाठी इच्छुक असलेले मूल-मुली किंवा त्यांचे नातेवाईक अगदी मित्रमैत्रिणी सुद्धा त्यांच्या नावे मॅट्रिमोनिअल साईट वर  नोंदणी करू शकतात. या साठी इंटरनेट वर अनेक मॅट्रिमोनिअल साईट्स उपलब्ध आहेत. नोंदणी करताना काही जुजबी माहिती टाकावी लागते. नाव, फोटो, मोबाईल, ई-मेल, पत्ता, वय, शिक्षण ,  जात – धर्म, इत्यादी गोष्टी टाकाव्या लागतात. काही वेबसाईट्स मोफत सेवा देतात, तर काही वेबसाईट्स कडून चांगल्या आणि योग्य (त्यांच्या दृष्टीने) स्थळांची माहिती ठराविक मासिक रक्कम घेऊन दिली जाते.
एखादे प्रोफाइल आवडले तर त्या मुलाशी किंवा मुलीशी वेबसाइट्वरुनच संपर्क करता येतो. त्यानंतर पसंती झाली तर वैयक्तिक पातळीवर पुढील बोलणी सुरु होतात.
मॅट्रिमोनिअल साईटमध्ये धोके कोणते आहेत?
मॅट्रिमोनिअल साईटवर काही धोके आहेत. या बाबत मॅट्रिमोनिअल साईट जवाबदार असतेच असं नाही, मॅट्रिमोनिअल साईट चा वापर करून फसवणूक करणाऱ्या भामट्यांची संख्या वाढली आहे. फेसबुक वर जसे फेक अकाउंट बनवले जातात, त्याच पद्धतीने मॅट्रिमोनिअल साईट वरही फेक प्रोफाइल बनवली जातात. त्या फेक प्रोफाइल माध्यमातून समोरच्याची चांगलीच मोठी फसवणूक केली जाते. काही वेळा फेसबुक वरून एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे फोटो डाउनलोड केले जातात, आणि त्या द्वारे मॅट्रिमोनिअल साईट वर फेक प्रोफाइल केले जाते. काही वेळा त्रास देण्यासाठी ओळीच्या व्यक्तीचे फेक प्रोफाइल केले जाते. कुठेही फोटो टाकताना त्यामुळेच काळजी घेणं महत्वाचं असत. तसेच मॅट्रिमोनिअल साईट वर एखादे प्रोफाइल आवडले, तर त्यातील माहिती खरीच आहे असे मनू नये. प्रत्यक्षात चोकशी करायला हवी. भरपूर पगार, परदेशातील नोकरी इत्यादी अमिश दाखवून फसवणूक केली जाते.
आजपर्यँत कोणत्या प्रकारचे गुन्हे या साईट्स च्या माध्यमातून घडले आहेत?
मॅट्रिमोनिअल साईट च्या माध्यमातून आजवर अनेक गुन्हे घडले आहेत.  फेक प्रोफाइल तयार करून आर्थिक फसवणूक करणे, ओळखीच्या लोकांचे फेक प्रोफाइल बनवून त्यांना मानसिक त्रास देणे, इत्यादी अनेक गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यांना कायद्याने वेळीच योग्य ती शिक्षा होतेच. नुकतेच नाशिक, पुणे आणि ठाणे भागात फेक प्रोफाइल तयार करून, त्यानंतर विश्वास संपादन करून,  त्यावरून या ना त्या कारणाने पैसे मागून आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले. हे सर्व वेग वेगळे गुन्हे एकाच नामांकित मॅट्रिमोनिअल साईट वर झाले. मॅट्रिमोनिअल साईट वर ओळख करून  प्रत्यक्ष बोलावून फसवणूक केल्याचेही अनेक गुन्हे समोर आले आहेत.
वेबसाईट्स ने घ्यायची काळजी कोणती?
आजपर्यंत जेवढे गुन्हे मॅट्रिमोनिअल साईट्स वरून घडले आहेत त्या संदर्भात बऱ्याच वेळा कोर्टाने संबंधित मॅट्रिमोनिअल साईट वर ताशेरे ओढले आहेत. मॅट्रिमोनिअल साईट्स ना वारंवार तज्ञांकडून सूचना केल्या जातात. सर्व वापरकर्त्यांचे आयपी ऍड्रेस ठेवणे बांधकारक आहे. तसेच प्रत्येक वापरकऱ्याची योग्य आणि पूर्ण खरी ओळख पटवून घेणे, त्या संदर्भातील कागदपत्रे जमा करवून घेणे, इत्यादी अनेक तरतुदी आहेत. आज काही मॅट्रिमोनिअल साईट्स वर आधार किंवा अन्य ओळखपत्रांशिवाय नोंदणी करता येत नाही.
परंतु ओळख पत्राशिवाय इतर कोणतेही प्रोफाईलही बघता यायला नकोत. तसेच कोणत्या आयडी वरून कोण कोणते प्रोफाईल्स बघितले गेले याचीही नोंद साईट्स ने ठेवायला हवी. प्रोफाईलने वापरलेला फोटो खरा आहे कि खोटा हे हि पडताळून पाहायला हवे. तसेच मॅट्रिमोनिअल साईट हि केवळ लग्न जमवण्यासाठी साठी आहे, डेटिंग साईट नाही हि भूमिका वेबसाईटनेच आपल्या वापरकर्त्यांना स्पष्ट करायला हवी.
आपण मॅट्रिमोनिअल वेबसाईट वापरताना कोणती काळजी घ्यावी?
मॅट्रिमोनिअल साईट्स वर आपली खाजगी माहिती टाकताना काळजी घ्यावी. काही वेबसाईट्स वर आपले नाव आणि फोटो सरसकट सर्वाना दिसतो. तर काही वेबसाईट्स वर केवळ नोंदणी केल्यानाच हि माहिती दिसते. फोटो टाकताना त्या फोटोचा गैरवापर होणार नाही असा फोटो टाकावा. खूप जुने फोटो टाकू नयेत.
वय, जन्मतारीख, पगार, इत्यादी गोष्टी विचारपूर्वक टाकाव्या. आपली काही वैयक्तिक माहिती टाकू नये – उदा. १) आपले छंद, आवडी निवडी  २) दिवसभराचे वेळापत्रक – म्हणजे सकाळी कधी उठतो, ऑफीसला कधी जातो इथपासून सुट्टीच्या दिवशी काय करतो इथपर्यंत. ३) घरी किती जण आहेत आणि त्यांचे संपूर्ण वेळापत्रक, शिक्षण पगार इत्यादी. ४) भविष्यातील योजना ५) चांगले किंवा वाईट अनुभव.
या माहितीच्या आधारे एखादा भामटा तुम्हाला सहज गंडवू शकतो. युमच्या आवडी निवडी, छंद , भविष्यातील अनुभव, घरच्यांचे पगार आणि तुमचे वेळापत्रक याचा वापर करून तुमचं संपूर्ण खाजगी आयुष्य एखाद्यासमोर चित्रस्वरुपात उभे राहते. ज्याचा वापर करून तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
लग्न झाल्यानंतर मॅट्रिमोनिअल साईट वर केलेली नोंदणी काढून टाकणेही तितकेच महत्वाचे असते. आणि हे काम न चुकता करावे.
मॅट्रिमोनिअल साईट संदर्भात कोणतीही , कोणीही फसवणूक केल्यास किंवा आपल्याला धोका जाणवल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन शी संपर्क करायला हवा किंवा सायबर तज्ञांची मदत घ्यायला हवी.
मॅट्रिमोनिअल वेबसाईटची जवाबदारी कुठे संपते आणि आपली जवाबदारी कुठे सुरु होते हे आपण वेळीच ओळखायला हवे. आपली ऑनलाईन सुरक्षा आपल्याच हातात असते.
President, Cyber Sakshar [Cyber Security Analyst and Consultant]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!