निवडणूका, ऑनलाईन प्रचार आणि सायबर धोके

निवडणूक कुठल्याही असल्या तरी उमेदवाराचा प्रचार तेवढाच महत्वाचा असतो. पूर्वी पासून चालत आलेला पारंपरिक प्रचार आज हि चालू आहेच पण नवीन तंत्रज्ञानासोबत प्रचारही हायटेक होऊ लागला आहे. ऑनलाईन प्रचाराचे अनेक प्रकार आहेत अनेक पद्गति आहेत. पण सर्वात महत्वाची असते ती वॉर रूम.
वॉर रूम म्हणजे काय?
कोणत्याही ऑनलाईन प्रचारासाठी महत्वाची भूमिका असते वॉर रूम ची. वॉर रूमसाठी कॉम्प्युटर्स, मोबाईल, इंटरनेट, काही प्रमाणात मनुष्यबळ लागते.   वॉर रूम चे काही प्रकार आहेत.
त्यातील पहिल्या प्रकारात प्राथमिक विश्लेषण आणि निर्णय घेणे, अंदाज बांधणे, डिजिटल युक्त्या शोधणे इत्यादी गोष्टी येतात. त्यानंतर त्या नुसार काम सुरु केले जाते.
दुसऱ्या प्रकारात  प्रत्यक्षात प्रचार केला जातो, पण हायटेक पद्धतीने. ज्यामध्ये सोशल मीडिया सांभाळणे असेल किंवा उमेदवाराची वेबसाईट तयार करणे असेल. ईमेल्स, मेसेज, व्हाट्सएप्प इत्यादी माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत उमेदवाराचा प्रचार कसा पोचवता येईल हे बघता येते. उमेदवाराची स्वतःची वेबसाईट किंवा ऍप्प तयार केले तर माहिती जास्त प्रभावी पाने पोचवता येते आणि अधिक फायदा होतो.
तसेच वॉर रूमच्या तिसऱ्या प्रकारात निवडणुकीच्या आधीच्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी विविध माध्यमातून येणाऱ्या प्रतिक्रिया, लोकांचे आणि मीडिया चे बोलणे नोंदवले जाते. ज्यावरून अधिक अंदाज बांधता येऊ शकतो.
आपल्याकडे काही न्यूज चॅनेल्स वर अशा पद्धतीचे वॉर रूम दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.
ऑनलाईन प्रचार कोणाकोणाचा करता येऊ शकतो?
कोणत्याही पक्षाचे उमेदवार, कोणत्याही स्टारच्या निवडणुकीचे उमेदवार अगदी आमदार, खाजदारकीच्या उमेद्वारापासून तर नगरसेवकाच्या उमेद्वारापर्यंत. ऑनलाईन प्रचार हा केवळ राजकीय निवडणुकांसाठीच असतो असं नाही. काही वेळ स्थानिक संस्था किंवा खाजगी कंपन्या यांच्या कडे होणाऱ्या निवडणुकांसाठीही याचा वापर करता येतो. अनेकदा केवळ एका उमेदवाराचा नाही तर संपूर्ण पक्षाचा प्रचारही केला जातो.
ऑनलाईन प्रचार कसा करता येतो?
ऑनलाईन प्रचार करण्यासाठी सध्या अनेक मार्ग आहेत. वॉर रूम च्या माध्यमातून शक्य तेवढे सगळे मार्ग वापरले जातात. यामध्ये फेसबुक, ट्विटर सारखे सोशल मीडिया माध्यमे महत्वाची भूमिका बजावतात. फेसबुक पेज किंवा ट्विटर अकाउंट प्रचारासाठी सांभाळणे फार महत्वाचे काम असते. उमेदवाराचे आणि पक्षाचे म्हणणे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा हे उत्तम मार्ग आहे. आकर्षक डिजाईन, चित्रे किंवा व्यंग्यचित्रे, राजकीय विनोद, इत्यादी माध्यमातून हे करता येते. तसेच व्हाट्सएप्प, युट्युब विडिओ या माध्यमातून हि उत्तम प्रचार होतो. ऑनलाईन माध्यमातून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली जाते, ज्यामुळे मतदान न करणारेही मतदान करायला जातात.
अनेक नवीन उमेदवारांना या ऑनलाईन प्रचार आणि वॉर रूम बाबत फारशी माहिती नसते. अशांनी त्वरित या गोष्टींची माहिती करून घ्यायला हवी.
वॉर रूम आणि ऑनलाईन प्रचार कोण करू शकेल आणि त्यासाठी खर्च किती येतो?
वॉर रूम हि ज्या त्या पक्षाने किंवा उमेदवाराने उभी करून द्यायची असते, म्हणजे एखादी जागा जेथे वरील सर्व हायटेक सुविधा उपलब्ध असतील. काही छोट्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या यात उतरू लागल्या आहेत. उमेदवार किंवा एखादा पक्ष अशा कंपनी ला काम देऊ शकतो किंवा अनेक असे अनुभवी तज्ज्ञ आहेत त्यांची मदत घेता येऊ शकते. तसेच कोणती निवडणूक आहे त्यानुसार खर्च हि बदलतो, आज वरच्या आकडेवारीनुसार एक लाख ते सत्तर लाख पर्यंत ऑनलाईन खर्च केला गेला आहे.
ऑनलाईन प्रचारामधील सायबर धोके कोणते?
कोणतीही गोष्ट ऑनलाईन असेल तर त्यात सायबर धोके असतातच. ऑनलाईन प्रचार आणि वॉर रूम या बाबत एक सर्वात मोठा सायबर धोका म्हणजे अफवा. एका उमेदवाराच्या सोशल मीडिया टीम कडून विरुद्ध उमेदवाराविरुद्ध वाईट अफवा पसरवल्या जातात. कातून काही वेळा जबर गुन्हे हि घडतात. विरुद्ध पक्षाची वॉर रूम हॅक करणे किंवा वॉर रूम चा डेटा चोरणे, किंवा सोशल मीडिया टीम मधील माणसे फोडणे, इत्यादी गोष्टी होतात. या सर्व ऑनलाईन प्रचारावर आणि वॉर रूम वरती पोलीस आणि सायबर तज्ज्ञांचे कडक लक्ष असणार आहे, हे तितकंच खरं.
President, Cyber Sakshar [Cyber Security Analyst and Consultant]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!