गेल्या काही दिवसापासून अचानक मराठी ऑनलाईन वर्क नावाने एक वेबसाईट ची लिंक व्हाट्सअँप वर व्हायरल होते आहे. लिंक – www.marathionline.work
प्राथमिक तपासणीत सदर वेबसाईट पूर्णपणे खोटी असून या वेबसाईट द्वारे पैसे मिळतील असे खोटे आश्वासन दिले जाते असे आढळुन आले आहे. या साईट वर मोबाइल नम्बर आणि नाव टाकून नोंदणी करण्यास सांगितली जाते आणि एक लिंक व्हाट्सॲप स्टेटस ला ठेवण्यास दिली जाते. दिवसाला यातून ५०० रुपये मिळतील असे सांगितले जाते.
यात नक्की गडबड काय आहे –
१) हि वेबसाईट केवळ ६,७ दिवसांपूर्वीच सुरु झाली आहे. डोमेन आणि होस्टिंग बाहेरील देशातून घेतले आहे तसेच तपशील लपवले आहेत.
२) या वेबसाईट चा मुख्य उद्देश फक्त लोकांचा डेटा गोळा करणे आणि तो विकणे असा आहे.
३) नोंदणी झाल्यावर हि साईट यूजर ला वेगवेगळ्या जाहिराती असलेल्या साईट्स वर पाठवते.
लोकांनी अशा वेबसाईटच्या भूलथापांना बळी पडू नये. या डेटा चा दुरुपयोग केला जातो. तसेच या साईट्स शेयर करू नये.
हि वेबसाईट केवळ मराठी साठीच नसून अशा अनेक भारतीय भाषांमध्ये वेबसाईट तयार केल्या असून त्यातील काही अजूनही चालू आहेत, आणि काही संबंधित राज्यांनी बंद केल्या आहेत.
त्यामध्ये कन्नड www.kannadaonline.work
बांग्ला www.banglaonline.work
तेलगू www.teluguonline.work
तामिळ www.tamilonline.work
यांचा हि समावेश आहे.
लोकांनी अशा वेबसाईटच्या भूलथापांना बळी पडू नये. या डेटा चा दुरुपयोग केला जातो. तसेच या साईट्स शेयर करू नये.