वेब ३.० –
हे आहे इंटरनेट चे नवीन व्हर्जन. हे अजून पूर्णपणे अस्तित्वात आलं नाहीये, पण सुरुवात झालीये. पूर्णपणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर अवलंबून असलेले वेब ३.० इंटरनेटच्या क्षेत्रात नक्कीच क्रांती घेऊन येणार आहे.
वेब २. ० मध्ये आपला डेटा हा सेंट्रलाईझ (centralized) असतो. म्हणजेच इंटरनेट वापरणारा यूजर हा एक प्रॉडक्ट समजला जातो, आणि त्याचा डेटा हा संबंधित वेबसाईट किंवा कंपनीच्या मालकीचा असतो.
पण वेब ३. ० मध्ये हा सर्व डेटा डीसेंट्रलाईझ (decentralized) असणार आहे. तसेच यूजर हा त्या डेटा चा मालक असेल, कंपनी नाही. तुमच्या संपूर्ण डेटवर तुमचाच अधिकार असेल. तुमच्या परवानगी शिवाय तुमचा डेटा कोणी विकणार नाही, किंवा भाड्याने देणार नाही. तुमच्या डेटा चे सर्व व्यवहार तुम्ही करू शकाल आणि त्याचा मोबदला हि तुम्हालाच मिळेल.
अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ बघा – Click Here
अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब