काय आहे टेन ईयर चॅलेंज?

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतरही सोशल साईट्स वर 10 इयर चॅलेंज या हॅश टॅग सह फोटो टाकले जात आहेत. कोणी सुरू केले हे 10 इयर चॅलेंज, त्यातून नक्की कोणाला फायदा होत आहे, कोणाला नुकसान होऊ शकते..

नक्की काय आहे हे 10 इयर चॅलेंज?

10 इयर चॅलेंज हे फेसबुक ने सुरू केले, यात आपला आत्ताचा म्हणजेच 2019 चा एक फोटो आणि 10 वर्षांपूर्वीचा म्हणजे 2009 चा एक फोटो एकत्र करून टाकायचा असतो. 10 वर्षांपूर्वी आपण कसे दिसत होतो आणि आता कसे दिसत आहोत, हे जगाला दाखवण्याचा हा फक्त एक प्रयत्न.

या चॅलेंज चा गमतीशीर भाग?
10 वर्षांपूर्वी आपण कसे दिसत होतो आणि आता किती बदल झाला आहे, हे जगाला दाखवण्यात अनेकांना गम्मत वाटते. फक्त 10 वर्षच नाही, काही जणांनी 20, तर काहींनी अगदी 30 वर्षापूर्वीचे देखील फोटो टाकले आहेत. 10 इयर चॅलेंज चे फोटो अनेक सेलिब्रिटींनीही टाकले, या चॅलेंज चे फोटो टाकणे हा जणू ट्रेंडच झाला आहे. सोशल मीडियावर तर काही कॉलेज, संस्था आणि कंपन्यांनीही आपापल्या कंपनीचे 30,40 वर्षांपूर्वीचे फोटो किंवा लोगो टाकून या चॅलेंज मध्ये आपलेही योगदान दाखवले.

या चॅलेंज मागे फेसबुक आणि इन्स्टाग्राम ला फायदा कसा?
फेसबुकने हे चॅलेंज लोकांना देण्यामागे खूप मोठा विचार केला आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांना, मग ते सामान्य असो किंवा सेलिब्रिटी असो, रोज काही न काही नवीन ट्रेंड हवा असतो. 10 इयर चॅलेंज ने तेच केले. 10 इयर चॅलेंज चे करोडो फोटो टाकले गेले, त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर तसेच इतर काही सोशल साईट्स चा वापर दुपटीने वाढला. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर येणार आणि जाणार डेटा वाढला. डेटा ट्रान्सफर वाढल्या मुळे इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांनाही तेवढाच फायदा झाला. फेसबुक कडे प्रचंड मोठ्या प्रमाणात फोटोचा डेटा जमा होत गेला. या सर्व डेटा चा वापर फेसबुक आता आर्थिक फायद्यासाठी करणार आहे.

फेसबुक ला होणारे आर्थिक फायदे कोणते?

करोडो युजर्स नी आपले 10 इयर चॅलेंज चे फोटो टाकले, यातून यूजरचे केवळ मनोरंजन झाले. यूजर ला यातून कोणताही फायदा झाला नाही. परंतु फेसबुक कडे या फोटोंचा इतका डेटा जमा झाला आहे आणि होतो आहे, या डेटा चा वापर करून फेसबुक काही निष्कर्ष काढणार आहे.

1. 10 वर्षांपूर्वी चा चेहरा आणि आत्ताचा चेहरा यात झालेला बदल.
2. पूर्वीचे राहणीमान आणि आत्ताचे राहणीमान.
3. पूर्वीची आर्थिक परिस्थिती आणि आत्ताची आर्थिक परिस्थिती, किंवा नोकरी धंदा इत्यादींची परिस्थिती.

10 वर्षांत लोकांमध्ये किती बदल झाला, कोणत्या शहरातील लोक बदलेले, कोण विद्यार्थी अवस्थेतून कशा प्रकारे नोकरी धंद्यास लागले, राहणीमानात झालेला बदल, सवयी बदल, इत्यादी अनेक गोष्टीचे विश्लेषण केले जात आहे. या सर्व डेटा वरून अनेक अचाट करून टाकणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत.
कोणत्या शहरातील लोकांमध्ये जास्त बदल झाला आहे, कोणत्या पद्धतीचे शिक्षण घेतल्याने आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, या शिवाय अगदी कोण पहिल्यापेक्षा जास्त बिघडला आहे, हे देखील या डेटा मधून समोर येत आहे.
हा सर्व विश्लेषण केलेला डेटा, विविध स्तरांवर चक्क विकला जाणार आहे. लोकांचे राहणीमान, सवयी, शिक्षण आणि यात होणारे बदल या माहितीचा अनेक कंपन्यांना फायदा असतो. त्यांना हा डेटा अगदी अब्जावधीला विकला जाणार आहे. हे सर्व विश्लेषण यूजर ने सोशल साईट्स वर टाकलेल्या विविध माहिती च्या आधारे होणार आहे. यूजर ची जन्मतारीख, तो कुठे राहतो, कुठे काम करतो, काय काम करतो, शिक्षण कुठे झाले काय शिक्षण झाले, इत्यादी सर्व माहिती यूजर ने फेसबुक किंवा तत्सम माध्यमांवर टाकलेलीच असते.

या चॅलेंज मुळे अजून काय काय फायदे?
या 10 इयर चॅलेंज चा सर्वांत मोठा भाग म्हणजे फोटो. पूर्वीचा आणि आत्ताचा. अशा युजर्सच्या फोटोंचा अभ्यास करून देखील एक मोठा डेटा तयार केला जात आहे. यात 10 वर्षांमध्ये माणसाच्या चेहऱ्यात कसा आणि किती बदल होतो हा अभ्यास केला जात आहे. यावरून एकत्रितपणे माणसाच्या दिसण्यात होणार बदल आणि त्यातील डेटा याचा वापर आर्टिफिशिल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्यासाठी होईल. या सर्व डेटाच्या आधारे एक परिपूर्ण सिस्टीम तयार होईल, त्या सिस्टीम ला कोणताही जुना फोटो दिला तर 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी त्या फोटोतील व्यक्ती कशी दिसत असेल याचा अंदाज अधिक योग्य पद्धतीने लावता येईल. हा सर्व डेटा कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणाऱ्या कंपन्यांना विकला जाईल. तसेच फेस डिटेक्टशन म्हणजे चेहरा ओळखून त्याद्वारे विविध कृती करण्याऱ्या अँप बनवणाऱ्या कंपन्यांनादेखील
हा डेटा विकला जाईल.

या डेटा चा एक मोठा चांगला वापर होऊ शकतो?
पूर्ण विश्लेषण केलेल्या या सम्पूर्ण डेटा चा एक चांगला वापर करता येऊ शकतो. ठिकठिकाणचे स्थानिक पोलीस, किंवा सैन्य दल किंवा इतर सुरक्षा यंत्रणांना या डेटा चा खूप वापर होऊ शकतो. अनेकदा एखाद्या अट्टल गुन्हेगाराचा किंवा आतंकवाद्याचा खूप जुना एखादाच फोटो सुरक्षा यंत्रणांकडे असतो. या कृत्रिम बुद्धतीमत्तेच्या साहाय्याने त्या गुन्हेगारांचे सध्याचे फोटो तयार केले जाऊ शकतात. फेसबुकने हा डेटा सुरक्षा यंत्रणांना अगदी मोफत उपलब्ध करून द्यायला हवा.

या चॅलेंज चे धोके कोणते?
या चॅलेंज मुळे लगेच समोर येतील असे धोके नाहीत, परंतु काही वेळा अनेक अशा सिस्टीम आहेत जिथे लॉगिन करण्यासाठी डोळा किंवा फेस (चेहरा) डिटेक्ट करावा लागतो. अशा ठिकाणी यूजर ने टाकलेल्या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. काही बँकिंग सिस्टीम, किंवा सेक्युरिटी सिस्टीम मध्ये यामुळे फेरफार केला जाऊ शकतो. यूजर ने टाकलेल्या ‘फुकट’ मिळालेल्या फोटो डेटा चा वापर कंपन्या अब्जावधी ची संपत्ती बनवण्यासाठी करतील हे नक्की. आपली सायबर सुरक्षा ही आपल्या हातात असते.

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!