स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांची ‘थेरं’

influencers cyber sakshar

गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब कुठे तरी एका कोपऱ्यात बसून व्हिडिओच्या माध्यमातून शिव्या देणारे असोत किंवा खुले आम धमक्या देणारी थेरगाव क्वीन असो. थोड्या फार प्रसिद्धीसाठी, किंवा चर्चेत राहण्यासाठी हे लोक आज काल कोणत्याही पातळीला जाऊ लागले आहेत. 

१) १५ – १६ वर्षांचा एक मुलगा रोज नवीन व्हिडीओ टाकून शिवीगाळ करतो आणि त्या व्हिडीओ ला अब्जावधी लोक बघतात. 

२) २५-२६ वर्षांचा एक तरुण आपल्या छातीवर मारून मारून शिवीगाळ करतो, इतरांनाही शिवीगाळ करायला भाग पडतो. 

३) एक तरुण मुलगी आपल्या साथीदारांसह धमक्या देणारे विडिओ बनवते. 

वरील उदाहरणे हे सध्याच्या इंटरनेटवरील काळी आणि भयानक वास्तव दाखवतात. नक्की हे सर्व काय आहे, बघूया. 

 

cybersakshar-fake-influencers-cringe2

 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोण ?

खरे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोण असतात, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर नीट वाचा. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण किंवा कोणत्याही वयाच्या लोकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करणारे ते खरे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. मग त्यात व्यवसायात मदत करणाऱ्यांपासून, तर आत्मविश्वास वाढवणाऱ्यांपर्यंत. एखादी चांगली गोष्ट वापरा, किंवा त्याचे फायदे तोटे समजावून सांगणारे ही अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. या सर्वांचे मोठ्याप्रमाणात फॉलोवर्स देखील आहेत.

 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होण्याचे फायदे काय ?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांना प्रभावित करू शकतो. एखादी वस्तू घ्या, एखादी घेऊ नका, इथपासून तर अगदी एखाद्याला आर्थिक मदत करा, यासाठी सुद्धा ते प्रभावित करू शकतात आणि करत आहेत. अनेकदा या गोष्टीचा राजकीय पक्ष सुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग करून घेतात. या सगळ्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला एक चांगली रक्कम मिळतेच, शिवाय काही भेटवस्तू वगैरे मिळतात. हि रक्कम अगदी पाच हजार पासून १० लाख रुपयांपर्यंत असते, हे विशेष.

 

स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनून होणारी फसवणूक –

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला होणार आर्थिक फायदा आणि मिळणारे प्रसिद्धी यासाठी अनेक स्वयंघोषित तयार होतात. आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहोत हे सिद्ध करण्यासाठी लागतात भरपूर लाईक्स, आणि प्रचंड फॉलोवर्स. खरोखर मेहनत करून, चांगले व्हिडीओ टाकून खरे फॉलोवर मिळवणारे अनेक लोक आहे. पण फॉलोवर विकत घेऊन रातोरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनतात ते हे स्वयंघोषित. ५-१० लाख फॉलोवर्स झाले, कि याना रान मोकळे होऊन जाते. विविध कंपन्या आपले ब्रॅण्ड्स घेऊन यांच्याकडे येतात. आणि हे चक्र सुरु होते. पण आजकाल कंपन्या सुध्या हुशार झाल्या आहेत. तो / ती खरोखर इन्फ्लुएन्सर आहे का याची ते तपासणी करतात. तसेच त्यांचे फॉलोवर खरे आहेत का, याची सुद्धा तपासणी करतात. त्यामुळे स्वयंघोषितांचा बाजार उठत चालला आहे. 

 

वाढती अश्लीलता –

लाईक्स आणि फॉलोवर्स वाढवण्यासाठी अनेक तरुण तरुणी अश्लीलतेच्या परिसीमा गाठताना दिसत आहेत. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयीन तरुणी विविध अश्लील फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर टाकतात. पुरेसे लाईक्स आणि फॉलोवर मिळाले कि फोटो डिलीट  करतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, कि इंटरनेटवर या गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात आणि त्या कधीच पूर्णपणे काढून टाकता येत नाहीत. काही मुलंमुली यागोष्टी अनावधानाने करतात, परंतु काही जण अश्लील व्हिडीओ किंवा अश्लील संभाषण  मुद्दाम व्हायरल करतात, आणि त्यातून प्रसिद्धीचा मार्ग शोधतात. परंतु हि प्रसिद्धी नसून कुप्रसिद्धी आहे, याची त्यांना जाणीव करून देणारे कोणीच त्यांच्या सोबत नसतात. 

 

पालकांनी लक्ष देण्याची गरज –

आपला मुलगा किंवा मुलगी कोणते ऍप वापरतो आहे, कोणाशी काय बोलतो आहे याकडे आज काल बरेच पालक लक्ष देतात. परंतु आपला पाल्य कोणत्या प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकतो आहे, याकडे लक्ष देत नाहीत. अनेक पालक सोशल मीडिया वापरात नाहीत, त्यामुळे आपला पाल्य इंटरनेटवर अश्लीलतेच्या जगात व्हायरल झाल्याचा त्यांना पत्ता हि लागत नाही. पालकांनी आपल्या पाल्याचे मोबाईल, त्यातील अँप आणि फोटो विडिओ नेहमी तपासून पाहायला हवेत. आपला पाल्य आपल्या खोलीत बसून काय काय करतो आहे, याकडे त्यांचे लक्ष हवे.

 

यासाठी कोणते अँप जवाबदार ? 

मुलगा साडी घालून मेकअप करून अश्लील चाळे करतोय, तर एखादी मुलगी विचित्र डान्स करतेय. कोणी पावडर उडवतोय, तर कोणी चिखल. हे दृश्य दिसायचे ‘टिक टॉक’ सारख्या अँप वर. विविध कारणांमुळे ‘टिक टॉक’ सरकारने बंद केले, पण हे ‘थेरं’ बंद झाले नाहीत. हे सगळे थेरं आता सुरु झाले, इंस्टाग्राम रिल्स वर. ते कमी होत कि काय युट्युब ने सुद्धा ‘शॉर्ट्स’ सुरु केले. याशिवाय अजून हे असेल नवीन अँप बाजारात आले आहेतच. आपले अँप वापरल्याबद्दल ते व्हिडीओ बनवणाऱ्याना पैसे देतात ते वेगळेच. आपल्या अँप वर अश्लील फोटो, विडिओ तसेच विचित्र काही व्हिडीओ टाकले जाणार नाहीत, याची काळजी ज्या त्या अँप ने घेणे गरजेचे असते, पण ते तशी काळजी घेताना दिसत नाहीत. 

 

कायद्याचा वचक –

अश्लील व्हिडीओ, शिवीगाळ आणि प्रक्षोभक व्हिडीओ तयार करणे, शेयर करणे इत्यादी साठी कायद्यात पुरेशा तरतुदी नाहीत. यांच्या विरोधात ना कोणी तक्रार दाखल करून घेतं ना यांच्यावर कारवाई होते. प्रकरण खूप च हाताबाहेर गेलं कि थोडी फार कारवाई ‘दाखवली’ जाते. माहिती तंत्रज्ञान कायद्यात याबाबत बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे, आणि तेही वेळीच. 

 

शेवटी अशा स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ना एक विनंती –

“तुम्ही नक्कीच चांगलं काही काम करू शकता. कोवळ्या वयाच्या मुलामुलींची माथी भडकवून त्यांनाही वाईट विचार करायला लावण्यापेक्षा, चांगलं काही शिकवा. चांगले व्हिडिओ बनवता येत नसतील, तर बनवूच नका. कारण जेंव्हा कधी कायद्यात सुधारणा होईल तेंव्हा तर गय केली जाणारच नाही, पण पालकांच्या सहनशक्तीला सुद्धा काही मर्यादा आहे. तुम्हाला तर १ लाख मुलामुलींचा पाठिंबा असेल, तर लक्षात ठेवा २ लाख पालक तुमच्याशी असहमत आहेत.”अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible  – Click Here to Listen

 

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top
error: Content is protected !!