काय आहे वेब ३.०? जाणून घ्या

web3.0 in marathi cyber sakshar

गेल्या काही वर्षांमध्ये  इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि या इंटरनेटची सुरुवात कधी झाली होती?

जे आपण सध्या “वेब” वापरतो ते कधी सुरु झाले होते? त्याचे काही प्रकार सुद्धा आहेत का? आज आपण त्याबद्दल बघणार आहोत.
वेब मध्ये अनेक बदल होत गेले – वेब १.० वेब २.० आणि नंतर वेब ३.० ..

काय आहेत वेब १.० आणि वेब २.० –
अगदी सुरुवातीच्या काळात जेंव्हा इंटरनेट नव्याने उदयाला आले होते, तेंव्हा वेबसाईट म्हणजे अगदी काही साधे वेबपेज असायचे. त्याला आपण स्टॅटिक वेबपेज म्हणतो. हे पेज एकमेकांना जोडलेले असायचे, आणि वेबसाईट बनायची. त्यात कोणतेही जास्त फंक्शन नव्हते, कोणतेही आधुनिक फीचर्स नव्हते. लॉगिन, रेजिस्ट्रेशन वगैरे काहीच नाही. फक्त माहिती देवाण घेवाण होईल, इतकंच. हे सर्व “वेब १.०” नावाने ओळखलं जातं. साधारण याचा काळ होता १९९१ ते २००४ च्या सुरुवातीपर्यंत.

त्यानंतर आले ते वेब २.०. २००४-५ पासून अगदी आत्तापर्यंत आपण वापरतो ते वेब २.०.
यात नवीन फीचर्स आले. विविध प्रोग्रामिंग लँग्वेज उदयाला आल्या. माहिती देवाण घेवाण अधिक प्रभावी झाली. सोशल मीडिया सुरु झाले. इंटरनेट जाहिराती आणि डिजिटल मार्केटिंग  यांचा उदय झाला. देता चोरी, ऑनलाईन फसवेगिरी इत्यादी प्रकार ही सुरु झाले. डेटा वाढत गेला आणि मोबाईल छोटा होत गेला. बाजारात विविध ॲप आले. प्रत्येक व्यवसाय आणि खाजगी आयुष्य इंटरनेटवर विसंबून राहायला सुरुवात झाली. डेटा चे मोल वाढत गेले. डेटा विकला जाऊ लागला. काही विशिष्ठ कंपन्यांची मक्तेदारी सुरु झाली. आणि अजूनही सुरु आहे.

वेब ३.० –
हे आहे इंटरनेट चे नवीन व्हर्जन. हे अजून पूर्णपणे अस्तित्वात आलं नाहीये, पण सुरुवात झालीये. पूर्णपणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर अवलंबून असलेले वेब ३.० इंटरनेटच्या क्षेत्रात नक्कीच क्रांती घेऊन येणार आहे.
वेब २. ० मध्ये आपला डेटा हा सेंट्रलाईझ (centralized) असतो. म्हणजेच इंटरनेट वापरणारा यूजर हा एक प्रॉडक्ट समजला जातो, आणि त्याचा डेटा हा संबंधित वेबसाईट किंवा कंपनीच्या मालकीचा असतो.
पण वेब ३. ० मध्ये हा सर्व डेटा  डीसेंट्रलाईझ (decentralized) असणार आहे. तसेच यूजर हा त्या डेटा चा मालक असेल, कंपनी नाही. तुमच्या संपूर्ण डेटवर तुमचाच अधिकार असेल. तुमच्या परवानगी शिवाय तुमचा डेटा कोणी विकणार नाही, किंवा भाड्याने देणार नाही. तुमच्या डेटा चे सर्व व्यवहार तुम्ही करू शकाल आणि त्याचा मोबदला हि तुम्हालाच मिळेल.  

web 3.0 in marathi by cyber sakshar

वेब ३. ० चे फायदे –
१) वेब ३. ० पूर्णपणे  डीसेंट्रलाईझ (decentralized) असणार आहे.
२) सध्याच्या वेब २. ० मध्ये आपण इंटरनेट वापरतो, वेबसाईट्स वापरतो, त्याबदल्यात आपलाच डेटा विकला जातो. वेब ३. ०  मध्ये वेबसाईट्स वापरल्याबद्दल आपल्याला आर्थिक फायदा होणार आहे. विविध टोकन च्या माध्यमातून यूजर ला मोबदला मिळणार आहे.
३. युट्युब सारख्या वेबसाईट वर आपण व्हिडीओ टाकतो, पण त्याबदल्यात सगळ्यांनाच मोबदला मिळत नाही. वेब ३. ० वर अशा काही वेबसाईट आहेत जिथे विडिओ टाकल्यावर किंवा बघितल्यावर ही मोबदला मिळणार आहे – टोकन च्या स्वरूपात.
४) वेब ३. ० वर आर्थिक व्यवहार हे अजून सोपे होणार आहेत. जवळ जवळ सर्वच व्यवहार हे क्रिप्टोकरन्सी च्या माध्यमातून होणार आहेत. आपली खरी ओळख न दाखवता हे व्यवहार होणार आहेत.
५) वेब २. ० वर आपण एखादा व्हिडीओ किंवा फोटो टाकला तर संबंधित वेबसाईट कधीही ते काढून टाकू शकते. अगदी न विचारता सुद्धा. पण वेब ३. ० वर हे शक्य होणार नाही, कारण हा डेटा फक्त एका सर्व्हर वर नसेल. ब्लॉकचेन मधील अनेक आणि विविध ठिकाणी हा डेटा साठवलेला असेल. एवढ्या सर्व ठिकाणाहून एकाच वेळी हा डेटा काढून टाकणं जवळ जवळ अशक्य आहे.
६) डेटा किंवा वेबसाईट हॅक करणे फारसे सोपे राहणार नाही. कारण ब्लॉकचेन वर एकाच वेळी एवढे हल्ले करणे सोपं काम नाही.
७) इंटरनेटवर कोणाची एकाची मक्तेदारी नसेल.
८) DAO नावाच्या एका स्वायत्त संस्थेकडून या सर्व गोष्टी हाताळल्या जातील. आणि या DAO मध्ये कोणीही असू शकतं.

वेब ३. ० चे तोटे –
१) आर्थिक व्यवहार हे निनावी होणार असल्याने तसेच हे क्रिप्टोकरन्सी च्या माध्यमातून होणार असल्याने आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ शकते.
२) डीसेंट्रलाईझ (decentralized) डेटा असल्यामुळे कदाचित गुन्हे तपासात अडचणी येणार आहेत.
३) अश्लील किंवा बदनामीकारक माहिती, फोटो किंवा व्हिडीओ काढून टाकणे अशक्य होणार आहे. एखाद्या नेत्याबद्दल काही बदनामी करणारे व्हिडीओ जर व्हायरल झाले, तर ते पूर्णपणे काढून टाकणे शक्य होणार नाही. तसेच तो व्हिडीओ कोणी टाकला होता तेही समजणार नाही.
४)  वेब ३. ०  मध्ये कोणतीही सेन्सॉरशिप नसेल. त्यामुळे अश्लील आणि प्रक्षोभक गोष्टींना उधाण येईल.
५) क्रिप्टो चे वॉलेट हॅक झाल्यास डोक्याला हात लावून बसण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही.

भारतात क्रिप्टोकरन्सी अधिकृत नाही, पण ते अनधिकृत आहे असंही म्हणता येत नाही. त्यामुळे भारत सरकार या वेब ३.० कडे आणि क्रिप्टो च्या विश्वाकडे कसे पाहणार यासाठी वाट बघावी लागणार आहे. पुढील भागात आपण वाचणार आहोत वेब ३. ० मधील महत्वाचा टप्पा – मेटॅव्हर्स.

 

अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ बघा – Click Here

 

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible  – Click Here to Listen

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top
error: Content is protected !!
Cyber sakshar Diwali Ank 2023