एन एफ टी (NFT) म्हणजे काय?

मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले.  मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि पुढील काही वर्ष ही हवा अशीच राहणार आहे.

NFT म्हणजे नक्की काय ?
NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन non-fungible token. ब्लॉकचेन च्या माध्यमातून तयार केलेले असे टोकन जे कोणत्याही इतर टोकनने बदलता येणार नाही.
कोणतेही चित्र, वस्तू, वस्तू, जागा, जमीन, आवाज अगदी एखादा ग्रह सुद्धा  एन एफ टी बनू शकतो. या प्रत्येक एन एफ टी ला एक ठराविक किंमत असते तसेच त्या एन एफ टी च्या मालकाची माहिती सुद्धा त्यात असते. किंमत मालक कधीही किती हि वेळा बदलू शकतो. ते एन एफ टी बनवणारा  आणि सध्याचा मालक हे दोन्ही वेगळे असू शकतात. एन एफ टी विक्री केल्यानंतर त्याची ठरावीक रक्कम आधीच्या मालकाला मिळते. तसेच सौजन्य म्हणून पुढे त्या एन एफ टी संबंधित जे काही व्यवहार होतील त्यातील थोडी रक्कम त्या एन एफ टी च्या निर्माणकर्त्याला देखील मिळत राहते.

 

NFT कसे तयार करता येतात ?
आपण कोणत्याही गोष्टीचा एन एफ टी बनवू शकतो. एन एफ टी बनवण्याच्या साईट वर गेल्यावर हे सर्व पर्याय तेथे उपलभ होतात. आपण कोणताही फोटो, हाताने काढलेले चित्र, सॉफ्टवेयर ड्रॉइंग, एखादी जागा, एखादी वास्तू, एखादा पूर्ण ग्रह, जमिनीचा तुकडा, पशु पशांचा आवाज, आपला स्वतः चा आवाज, एखादा व्हिडीओ, इत्यादी काहीही आपण या साईट च्या माध्यमातून एन एफ टी मध्ये रूपांतरित करू शकतो. एकदा एका व्यक्तीने त्या विशिष्ट गोष्टीचे एन एफ टी बनवले, तर त्याच गोष्टीचा दुसरं कोणीही एन एफ टी बनवू शकत नाही. वाचायला किंवा ऐकायला हे जरा अवघड वाटत असलं तरी ते तितकं अवघड नाही.

 

NFT साठी कोणत्या वेबसाईट आहेत ?
एन एफ टी तयार करण्यासाठी तसेच ते विक्रीस ठेवण्यासाठी अनेक वेबसाईट्स आहेत. त्यातील “ओपन सी” हि सर्वात जलद आणि प्रसिद्ध साईट आहे. या साईट वर अनेक एन एफ टी आपण बघू शकतो, आपले विकू शकतो तसेच हवे असल्यास खरेदी करू शकतो. हे खरेदी विक्री व्यवहार क्रिप्टो च्या माध्यमातून होत असले, तरी ते थेट केले जात नाहीत. यासाठी अनेक ‘पेमेंट गेटवे’ उपलब्ध आहेत. “मेटा मास्क” हा त्यातील च एक प्रसिद्ध पर्याय आहे. हे एक पराकारचे वॉलेट आहे असं आपण म्हणू शकतो. “मेटा मास्क” च्या माध्यमातून हे सगळे व्यवहार होतात. “ओपन सी” वर एखाद्या इ कॉमर्स साईट प्रमाणे हे सर्व एन एफ टी खरेदी विक्री केले जातात.

 

NFT चे फायदे कोणते ?
१) एन एफ टी चे अनेक फायदे आहेत. मेटाव्हर्स मध्ये अनेक अशा गोष्टींची गरज लागणार आहे, ज्या गोष्टी प्रत्यक्ष जगात आहेत, पण आभासी जगात नाहीत. अशा सर्व वस्तू एन एफ टी च्या माध्यमातून मेटाव्हर्स मध्ये येतील.
२) एन एफ टी चे सर्व व्यवहार हे क्रिप्टो च्या माध्यमातून होणार असल्याने सर्व अगदी जलद आणि निनावी होते.
३) ब्लॉकचेन चा वापर केल्याने इतर सिस्टीम पेक्षा यात सुरक्षितता जरा जास्त आहे असे म्हणता येईल.
४) अनेकांसाठी हे एक चांगले मोठे उत्पन्न आहे.  
५) भारतातील अनेक उद्योगपति आणि सेलिब्रिटींनी आपले एन एफ टी केले आहेत. काहींनी आपले आवाज एन एफ टी केले आहेत.

 

NFT चे तोटे कोणते ?
एन एफ टी चे तोटे असे फार नाहीत. सर्व व्यवहार आभासी चलनाच्या माध्यमातून होत असल्याने त्याची काळजी घ्यावी लागते. तसेच प्रत्यक्षात तुम्ही मालक असलेल्या एखाद्या वस्तूची किंवा गोष्टीची कोणी एन एफ टी बनवली, तर त्याचा पत्ता लागणे फारच कठीण आहे.

 

पुढील अनेक वर्ष मेटॅव्हर्स आणि एन एफ टी यातील विविध पैलू अनुभवण्यात जाणार आहेत. तर तयार राहा पुढील भागात एन एफ टी च्या माध्यमातून पैसे कसे मिळवले जातात हे वाचण्यासाठी.

 

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible  – Click Here to Listen

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top