सावधान, तुम्हाला कुणीतरी पाहतंय, सावधान तुम्हाला कुणीतरी ऐकतय…..

अश्मायुतील माणूस दगडाचा वापर करून स्वतःची “अन्न” ही गरज भागवायचा,हळु हळु तो शेती करायला शिकला, चाका सोबत नवनवीन अवजारांचा शोध लावत गेला, अन् सोबतच तंत्रज्ञान विकसित होत गेले, अन् आजच्या युगात अन्न वस्त्र निवारा , सेक्स आणि इंटरनेट या माणसाच्या अत्यावश्यक गरजा झाल्या आहेत अस म्हंटले तर काहीच वावग ठरणार नाही; कारण अन्न, वस्त्र अन् […]

डिजीटल इंडियाची डिजीटल गुन्हेगारी

डिजीटल इंडिया डिजीटल इंडिया नारा जेव्हा आपले नेते पुढारी लावतात तेव्हा ते ऐकण्यासाठी फार मनोरंजक वाटत परंतु असा नारा देण्याआधी व त्याची जबरदस्ती जनतेवर लादण्याआधी आपण खरोखर त्यासाठी तंत्रज्ञानाच्या दुष्टिने सक्षमआहोत का याचा गहन विचार करणे आवश्यक  आहे पुण्यात झालेल कॉसमॉस बॅक प्रकरण खरच डिजीटल इंडिया च्या संकल्पनेला सुरुंग लावल्यासारख आहे भारतातील मुख्य बँका जशा आरबीआय, […]

भेदिले सायबर मंडळे.!

सायबर सुरक्षा हा सध्याचा अत्यंत गुंतागुतीचा असलेला, पण सर्वार्थाने आपले विश्व व्यापणारा विषय. हा विषय मी अतिशय मनापासून वाचतो, याचे कारण मला या विषयाची आवड आहे. सध्याचा प्रश्न आहे तो सायबर सुरक्षेविषयी अधिक तपशील मिळवायचा आणि त्यासंबंधात काळजी करण्याचा. मी स्वत: पत्रकार आहे आणि मी ज्या वृत्तपत्रात काम करत होतो तिथे जेव्हा सुरुवातीला संगणक आले […]

जामताड़ा : सबका नंबर आयेगा

१ ऑगस्ट २०१९, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, सौ. प्रेनीत कौर यांच्या मोबाईलवर कॉल येतो. तो कॉल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीतल्या जनकपूर शाखेच्या मॅनेजरचे केलेला असतो. “मैडम जी, आपके सॅलरीके तेवीस लाख अकाउंटमे जमा करणे है, प्लिज आप यहा आके प्रोसेस करे. तीन तारीख तक जमा नही किये तो वो अमाऊंट लॅप्स हो जायेगी.”मॅडम थोड्याश्या […]

सावध ऐका पुढल्या हाका

मध्यंतरी एक स्नेही भेटायला आले. एका मुलीचं कौन्सीलिंग करायचं आहे असं सांगितलं. मुलीची माहिती घेतली तेव्हा समजले की मुलगी काही दिवसांपूर्वी एका मुलाबरोबर पळून गेली होती आणि धावपळ करून तिच्या घरच्यांनी तिला परत आणण्यात यश मिळवले होते. पण तिच्या आईवडीलांना वाटत होते की ती पुन्हा असा प्रयोग करेल की काय. यासाठी तिला समजावून सांगा, असा […]

कोण आहे मुस्कान बावा? तिने शिक्षणासाठी इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपये मागितले आणि ट्रोल झाली. काय आहे नक्की प्रकार?

आजकाल क्राउडफंडिंग ही एक सामान्य संकल्पना बनली आहे. क्राउडफंडिंग म्हणजे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून आर्थिक मदत घेणे. सध्या क्राउडफंडिंगमध्ये मदत करणाऱ्या अनेक वेबसाइट्स आहेत. पैसे उभारण्याची ही पद्धत आजारी लोकांसाठी फार पूर्वीपासून वापरली जात आहे. गरीब किंवा गरजू लोक, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे, ते अशा प्रकारे पैसे गोळा करतात आणि उपचार घेतात.   पण, […]

एन एफ टी (NFT) म्हणजे काय?

मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले.  मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि पुढील काही वर्ष ही हवा अशीच राहणार आहे. NFT म्हणजे नक्की काय ? NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन non-fungible token. ब्लॉकचेन च्या माध्यमातून तयार केलेले असे टोकन जे कोणत्याही इतर टोकनने बदलता येणार नाही. […]

मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?

मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटाव्हर्स. संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग. पण ते इतके हुबेहूब ज्यामुळे असा प्रश्न पडेल कि खरे जग चांगले कि आभासी जग? नक्की काय आहे मेटाव्हर्स? मेटाव्हर्स हा AI आणि […]

स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांची ‘थेरं’

गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब कुठे तरी एका कोपऱ्यात बसून व्हिडिओच्या माध्यमातून शिव्या देणारे असोत किंवा खुले आम धमक्या देणारी थेरगाव क्वीन असो. थोड्या फार प्रसिद्धीसाठी, किंवा चर्चेत राहण्यासाठी हे लोक आज काल कोणत्याही पातळीला जाऊ लागले आहेत.  १) १५ – १६ वर्षांचा एक मुलगा […]

काय आहे वेब ३.०? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये  इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि या इंटरनेटची सुरुवात कधी झाली होती? जे आपण सध्या “वेब” वापरतो ते कधी सुरु झाले होते? त्याचे काही प्रकार सुद्धा आहेत का? आज आपण त्याबद्दल बघणार आहोत. वेब मध्ये अनेक बदल होत गेले – वेब १.० वेब २.० आणि नंतर […]

पेटीएम’ चे फेक ॲप – फसवणूक वाढतेय

आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण  ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करतो. एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही डिजिटल व्यवहार करतो. कधी बँकेचे ॲप वापरून तर कधी काही खाजगी कंपन्यांचे ॲप वापरून आपण पेमेंट करतो. गुगल पे, फोन पे, पेटीएम , इत्यादी अनेक ॲप उपलब्ध आहेत. […]

Back To Top