पेटीएम’ चे फेक ॲप – फसवणूक वाढतेय

paytm spoof app cyber sakshar

आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण  ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करतो. एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही डिजिटल व्यवहार करतो. कधी बँकेचे ॲप वापरून तर कधी काही खाजगी कंपन्यांचे ॲप वापरून आपण पेमेंट करतो. गुगल पे, फोन पे, पेटीएम , इत्यादी अनेक ॲप उपलब्ध आहेत. सर्व ॲप मध्ये एकच ‘युपीआय’ वापरलेला असतो त्यामुळे कोणतेही ॲप वापरले तरी ते युपीआय मार्फत आपल्या बँक खात्याला लिंक होते. गुगल पे किंवा पेटीएम सारख्या ॲपकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जातात ज्यामुळे लोक त्यांचे ॲप वापरतील.
पण अशाच डिजिटल इंडिया मध्ये अनेक फेक – खोटे ॲप बाजारात आले आहेत. या फेक ॲप च्या माध्यमातून होणारी फसवणूक नवीन नाही.

paytm spoof app cyber sakshar

 

पेटीएम नक्की काय काम करते?
पेटीएम चे ॲप सहसा पैसे भरण्यासाठी वापरले जाते. कोणतेही बिल असेल किंवा रिचार्ज असेल किंवा एखादी वस्तू किंवा सेवा घेतल्यानंतर त्याची रक्कम द्यायची असेल तर पेटीएम चा वापर केला जातो. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून पैसे ट्रान्सफर झाल्यावर एक बिल दिसते त्याला पेमेंट रिपोर्ट म्हणतात. तसेच त्यावर एक ‘ट्रँझाक्शन आयडी’ असतो. कोणी कोणाला , किती रक्कम पाठवली आणि तारीख वार सर्व त्यावर असतं. पेटीएम वर पाठवलेली रक्कम इतर माध्यमांप्रमाणेच बँक खात्यात तात्काळ जमा होते.

पेटीएम चे फेक ॲप नक्की कसे काम करते?
हे फेक ॲप अगदी साधे आहे. या ॲप चे रंग रूप अधिकृत ॲप सारखेच असते. परंतु यातून कोणतेही पैसे पाठवले जात नाहीत. या मध्ये ज्याला पैसे पाठवायचे त्याचे नाव टाकायचे, का पाठवायचे ते कारण लिहायचे. त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आणि रक्कम टाकून ‘सेंड’ वर क्लीक करायचं. लगेच बिल किंवा ‘पेमेंट रिपोर्ट’ समोर दिसू लागतो. त्यावर अधिकृत पेटीएम च्या रिपोर्ट प्रमाणेच सर्व दिलेले असते. नाव, रक्कम, ट्रांजेक्शन आयडी, इत्यादी. तो रिपोर्ट अगदी अधिकृत वाटावा इतका खरा दिसतो.  थोडक्यात या ॲप मध्ये तो फेक रिपोर्ट तयार केला जातो, ज्यामुळे समोरच्याला असे वाटते की पैसे पाठवले आहेत.

या फेक ॲप चा वापर करून फसवणूक कशी केली जाते?
आधी सांगितल्या प्रमाणे या ॲप मध्ये फेक रिपोर्ट तयार होतो जो हुबेहूब अधिकृत वाटेल. हे फेक
ॲप वापरणारे भामटे कोणत्याही दुकानांत, पेट्रोल पंप किंवा हॉटेल मध्ये जातात. बिल द्यायच्या वेळी पेटीएम नेच पैसे पाठवू शकतो असे सांगून मोबाईल नंबर नाव विचारतात. दुकानदाराचे नाव मोबाईल नंबर आणि रक्कम टाकल्यावर तो ‘फेक’ रिपोर्ट तयार होतो. त्यावर स्पष्ट उल्लेख केलेला असतो – “पैसे पाठवले”. प्रत्यक्षात दुकानदाराला पैसे मिळालेच नसतात. पण हे भामटे “आम्ही पाठवले आहेत, आमच्या खात्यातून रक्कम वजा झाली आहे. तुम्हाला पैसे पाठवल्याचा हा पुरावा घ्या.!” असे सांगून तोच खोटा रिपोर्ट दाखवत राहतात. दुकानदारही अशा वेळी होतील थोडा वेळानी जमा असा विचार करून त्या भामट्याना जाऊ देतो. त्यानंतर दुकानदार पैसे जमा होतील या आशेवर राहतो आणि ते जमा होतच नाहीत, कारण कधी पैसे पाठवलेच गेले नव्हते.

हे ॲप कोण तयार करत?
या ॲपचा वापर करण्यासाठी इंटरनेट लागत नाही. हे ॲप गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध नाहीत. असे फेक ॲप तयार करणाऱ्या काही कंपन्या आहेत तसेच काही भामटे डेव्हलपर आहेत. ते असे ॲप तयार करून आपल्या वेबसाईट वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देतात. या ॲप ला कोणत्याही सर्वर ची गरज नसते तसेच हे ॲप कोणीही सहज मोबाईल मध्ये टाकून घेऊ शकतो.

फेक ॲप ओळखायचे कसे?
हे फेक ॲप ओळखायला अगदी सोपे आहे. या ॲपचा लोगो अधिकृत वाटतो, पण या ॲपची नावे वेगवेगळी आहेत. पेटीएटीएम, पेटाईम, पेटीत-टाइम, तसेच टाईमपास पे, पेटीएम प्रँक इत्यादि नावाने हे ॲप आहेत.
हे कितीही अधिकृत दिसले तरी यात केवळ तो फेक रेपोर्टच तयार होतो. यात इतर कोणतेही ऑपशन्स चालत नाहीत. रिचार्ज मोबाईल, पे बिल, डिटीएच असे केवळ यात बटणं दिलेलं असतात, पण त्यावर क्लीक होत नाही. तसेच या फेक ॲप मध्ये पेटीएम चा मुख्य कणा असलेला ‘क्यू आर कोड’ चालत नाही. यावरून आपल्याला सहज ओळखता येते की समोरचा माणूस फेक ॲप वापरून गंडवण्याचा प्रयत्न करतो आहे.

फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर काय करणार?
अशा पद्धतीने अनेक छोटे मोठे दुकानदार, पेट्रोल पंप आणि अगदी काही व्यावसायिक यांची फसवणूक झालेली आहे. त्याच वेळी जर आपली फसवणूक होते आहे किंवा हे ॲपच खोटे आहे हे कळले तर च या फसवणुकीला आळा बसतो. अन्यथा याचा तपास करणे अवघड जाते. यात कोणतेही ‘इलेक्ट्रॉनिक ट्रांझाक्शन’ झालेलेच नसल्यामुळे हे ट्रेस करता येत नाही. कोणतीही रक्कम बँकेतून काढली गेलेली नसते, त्यामुळे बँकेचा यात काहीच संबंध येत नाही. हे ॲप आणि तयार केलेला रिपोर्ट हा इंटरनेट न वापरता तयार केलेला असतो तसेच हे ॲप केवळ त्या भामट्या च्या मोबाईल वर च असल्यामुळे सायबर पोलीस आणि तज्ज्ञांना योग्य तपास करता येत नाही. तरीही असा प्रकार घडल्यावर त्वरित पोलिसात तक्रार करावी.

पेपॅल आणि इतर माध्यमातूनही होते फसवणूक ?
असे फेक ॲप केवळ पेटीएम चेच आहेत असे नाही. पेपाल, गुगल पे, फोन पे  यांचेही फेक ॲप तयार केले गेले असून, पेपाल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या फेक (फिशिंग) वेबसाईट देखील आहेत. व्हाट्सअप्प सारख्या माध्यमातून या फेक वेबसाईट्स ची लिंक व्हायरल केली जाते. त्या लिंक वर क्लीक केले की आपण त्या खोट्या वेबसाईट वर येतो. तसेच काही वेळा ‘रिवॉर्ड’ च्या नावाखाली फेक ॲप डाउनलोड करवून घेतले जातात.

असे ॲप तयार करणे किंवा वापरणे, त्यातून कोणाची आर्थिक फसवणूक करणे हे गुन्हे आहेत. या गोष्टींकडे आपण चौकस राहून बघणे गरजेचे आहे. तसेच सर्वच दुकानदारांनी याबाबत एकमेकांना सूचित करणे गरजेचे आहे.

 

संबंधित व्हिडीओ पहा –

 

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible  – Click Here to Listen

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top