एसएमएस हेडर कसे चेक करणार?

आजकाल आपल्याला मोबाईल वर अनेक मेसेज येत असतात. त्यातील अनेक एसएमएस हे काही ना काही जाहिराती करणारे असतात. काही फसवे एसएमएस (Fraud SMS) आर्थिक फसवणुकीस कारण ठरतात. काहीवेळा बँकेकडून एसएमएस आला आहे असे भासवले जाते. परंतु प्रत्यक्षात तो एसएमएस भामट्यांकडून पाठवला गेलेला असतो. मग आता हा एसएमएस खरा कि खोटा ते कसे ओळखणार? तर ते […]

“सायबर साक्षर” दिवाळी अंकाला मसापकडून उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंक पुरस्कार प्रदान

पुणे : सायबर साक्षरच्या दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडून उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायबर साक्षर चे संस्थपाक आणि संपादक ओंकार गंधे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सायबर साक्षर कडून नेहमीच “सायबर जनजागृती आणि प्रशिक्षण” यासाठी काम केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून सायबर साक्षरकडून “सायबर सुरक्षा” विशेष असा दिवाळी अंक ऑनलाईन […]

ऑनलाइन व्यवसाय आणि सोशल मीडियाचे धोके

लॉकडाउनमध्ये ऑनलाइन व्यवसायांची संख्या वाढली. सोशल मीडियाचा वापर करून अनेक महिला व्यवसायांचे मार्केटिंग करत आहेत. मात्र, व्यावसायिक किंवा गिऱ्हाइक म्हणून पदरात दर वेळी चांगलाच व्यवहार पडेल याची खात्री नाही, तिथे फसवणूकही होऊ शकते! सध्या लॉकडाउन सुरू आहे आणि लॉकडाउन म्हणजे काम, नोकरी किंवा व्यवसाय बंद असा आपल्या मनात विचार येतो. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम […]

सदस्यांच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ऍडमीनला जबाबदार धरता येणार नाही, हायकोर्टाचा निर्णय

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील दुसर्‍या एखाद्या सदस्याने आक्षेपार्ह पोस्ट केल्यास व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ऍडमीनला कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरता येणार नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणाबाबत दिली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील एखाद्या सदस्याने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास अशा व्यक्तीस जबाबदार धरता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. आक्षेपार्ह पोस्ट म्हणजेच मेसेज, फोटो, ऑडिओ किंवा व्हिडीओ जे कायद्याचे उल्लंघन […]

व्हाट्सॲप पिंक आणि फ्री ‘नेटफ्लिक्स’ च्या नावाखाली फेक लिंक्स व्हायरल – मालवेयर करतोय हल्ला

गेल्या आठवड्याभरापासून व्हाट्सॲपवर दोन प्रकारच्या लिंक्स व्हायरल होत आहेत – १) व्हाट्सॲप पिंक – हे डाउनलोड करा आणि हिरवे असलेले तुमचे व्हाट्सॲप गुलाबी करा. २) फ्री नेटफ्लिक्स – हे डाउनलोड करा आणि नेटफ्लिक्स तसेच अन्य ओटीटी मोफत मिळवा. यासोबतच या लिंक्स इतरांना शेयर करण्यासही सांगितले जाते.   धोका – या दोन्ही लिंक्स फेक असून, त्यावर […]

अश्लील व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचे वाढते प्रकार – अनेक तरुणांची झोप उडवली

गेल्या काही महिन्यांपासून अश्लील व्हिडीओ कॉल द्वारे तरुणांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या काळात हे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. यात विशेषतः तरुण मुले आणि पुरुषांना लक्ष केले जाते. तसेच याबाबत तक्रार करण्यास फारसे कोणी पुढे येत नाही. कार्यप्रणाली – यामध्ये सर्वांत आधी फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीच्या नावाने तरुणांना […]

स्नेहा भोसले नावाने खोटे प्रोफाईल आणि होणारी फसवणूक

काही दिवसांपासून “स्नेहा भोसले” या नावाच्या फेसबुक अकाऊंटद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः या अकाऊंटवरून तरुण मुले आणि पुरुषांना लक्ष्य केले जात आहे. बदनामीच्या भीतीने फारसे कोणी तक्रार करण्यास पुढे येत नाही. कार्यप्रणाली – “स्नेहा भोसले” या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून अनेक तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. “फ्रेंड रिक्वेस्ट” स्विकारल्यावर स्नेहा भोसले […]

फेसबुक वेबसाइट बिल्डिंग आणि विनामूल्य क्लाऊड गेमिंग सेवा लवकरच

फेसबुकने नुकतीच वेबसाइट बिल्डिंग सर्व्हिस आणि विनामूल्य क्लाऊड गेमिंग सुरू करणार असल्याचे जाहीर केले.   फेसबुक होस्टिंग फेसबुक होस्टिंग सर्व्हिसेस पुढील काही महिन्यांत उपलब्ध असतील. होस्टिंग सेवा नवीन व्यवसायांना ट्रायल स्वरूपात विनामूल्य देण्यात येईल, त्यामुळे नवीन होस्टिंग पर्याय शोधत असलेल्या कंपन्यांना आकर्षित होतील. फेसबुक होस्टिंग सर्व्हिस चा एक मुख्य फायदा म्हणजे यूजरला त्यांचे व्हॉट्सअॅप संदेश […]

वेबसाईट लिंक शेयर करून ५०० रुपये मिळतील असे भासवणाऱ्या खोट्या वेबसाईट

गेल्या काही दिवसापासून अचानक मराठी ऑनलाईन वर्क नावाने एक वेबसाईट ची लिंक व्हाट्सअँप वर व्हायरल होते आहे. लिंक – www.marathionline.work प्राथमिक तपासणीत सदर वेबसाईट पूर्णपणे खोटी असून या वेबसाईट द्वारे पैसे मिळतील असे खोटे आश्वासन दिले जाते असे आढळुन आले आहे. या साईट वर मोबाइल नम्बर आणि नाव टाकून नोंदणी करण्यास सांगितली जाते आणि एक […]

Back To Top